दन जखमी, तीन अटकेतउरळ: स्थानिक पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बोरगाव वैराळे येथे सोमवार, २५ ऑगस्ट रोजी पोळ्याच्या दिवशी दोन गटांत क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाली. यात दोन जण जखमी झाले. उरळ पोलिसांनी या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल करून तीघांना अटक केली.पोलिस सुत्रांकडून प्राप्त माहितीनूसार, पोळ्याच्या दिवशी दुपारी ३ वाजताचे दरम्यान विकास रामचंद्र डोंगरे याने दिपक वैराळे यांच्या घरामागची बैलगाडी हटविली. या कारणावरून दिपक वैराळे, संदिप अंबादास वैराळे, उज्वला संदिप वैराळे यांनी संगनमत करून विकास डोंगरे यांना मारहाण केली. यावेळी विकासला विळा मारून जखमी केले. विकास डोंगरे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी उपरोक्त तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यापैकी संदिप वैराळेला अटक केली. दिपक वैराळेला उपचारार्थ अकोला येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसर्या बाजूने संदिप अंबादास वैराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विकास रामचंद्र डोंगरे, सागर विकास डोंगरे व विजेता सागर डोंगरे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून विकास डोंगरे व सागर डोंगरे यांना अटक केली.(वार्ताहर)
बोरगाव वैराळे येथे दोन गटात हाणामारी
दोन जखमी, तीन अटकेत
By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST2014-08-25T21:40:38+5:302014-08-25T21:40:38+5:30
दोन जखमी, तीन अटकेत
