नवी दिल्ली : वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्याच्या सरकारच्या निर्धारामुळे रिझर्व्ह बँक आपले उदार पतधोरण यापुढेही चालूच ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी पतधोरण जाहीर करताना धोरणात्मक व्याजदरात किमान 0.२५ टक्के कपात केली जाण्याची शक्यता असल्याचे एचएसबीसीच्या एका अहवालात म्हटले आहे.
चालू वित्तीय वर्ष संपत आले असून, या वर्षभरात रिझर्व्ह बँकेने १.२५ टक्के व्याज दरकपात केली आहे. मात्र २ फेब्रुवारीला पतधोरण जाहीर करताना व्याजदरात कोणतीही कपात न करता रेपो दर ६.७५ टक्के इतका कायम ठेवला होता. वित्तीय तूट ३.५ टक्के ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाचे चांगले परिणाम होतील.