Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुंबई शेअर बाजार १६0 अंकांनी घसरला

मुंबई शेअर बाजार १६0 अंकांनी घसरला

काल एक आठवड्यांचा उच्चांक केल्यानंतर शेअर बाजारांनी पुन्हा एकदा माना टाकल्या. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १६0 अंकांनी घसरून २७,४२५.७३ अंकांवर बंद झाला

By admin | Updated: January 14, 2015 00:16 IST2015-01-14T00:16:49+5:302015-01-14T00:16:49+5:30

काल एक आठवड्यांचा उच्चांक केल्यानंतर शेअर बाजारांनी पुन्हा एकदा माना टाकल्या. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १६0 अंकांनी घसरून २७,४२५.७३ अंकांवर बंद झाला

The Bombay Stock Exchange fell by 160 points | मुंबई शेअर बाजार १६0 अंकांनी घसरला

मुंबई शेअर बाजार १६0 अंकांनी घसरला

मुंबई : काल एक आठवड्यांचा उच्चांक केल्यानंतर शेअर बाजारांनी पुन्हा एकदा माना टाकल्या. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १६0 अंकांनी घसरून २७,४२५.७३ अंकांवर बंद झाला. कच्च्या तेलाच्या किमती ६ वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेल्यामुळे बाजाराला फटका बसला आहे.
रिअल्टी, तेल आणि गॅस, टिकाऊ वस्तू आदी क्षेत्रात विक्रीचा मारा झाल्याचे दिसून आले. डिसेंबरमध्ये किरकोळ महागाईचा दर ५ टक्क्यांनी वाढला, तसेच नोव्हेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन ३.८ टक्क्यांनी घटले. या नकारात्मक निकालांचा परिणामही बाजारात दिसून आला.
बीएसई सेन्सेक्स सकाळी २७,६११.५६ अंकांवर तेजीसह उघडला होता. नंतर मात्र तो २७,६७0.१९ ते २७,३२४.५८ अंकांच्या मध्ये हिंदोळत राहिला. सत्र अखेरीस २७,४२५.७३ अंकांवर बंद होताना त्याने १५९.५४ अंकांची अथवा 0.५८ अंकांची घसरण नोंदविली.
याआधीच्या तीन सत्रांत सेन्सेक्सने ६७६.४५ अंकांची वाढ मिळविली होती. ही वाढ २.५१ टक्के आहे. याबरोबर सेन्सेक्स एका आठवड्याच्या उच्चांकावरही गेला होता. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला एनएसई निफ्टी २३.६0 अंकांनी अथवा 0.२८ अंकांनी घसरून ८,२९९.४0 अंकांवर बंद झाला. निफ्टी ८,३00 अंकांच्या खाली घसरला आहे.
सेन्सेक्समधील कंपन्यांपैकी सर्वाधिक घसरण सहन कराव्या लागलेल्या कंपन्यांत आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, ओएनजीसी, एचडीएफसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे. या उलट आयटीसी, एमअँडएम आणि विप्रो यांचे समभाग वाढले.
दरम्यान, शेअर बाजारात जारी करण्यात आलेल्या हंगामी आकड्यानुसार, काल विदेशी गुंतवणूकदारांनी २४४.९५ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३0 कंपन्यांपैकी २१ कंपन्यांचे समभाग घसरले. ९ कंपन्यांचे समभाग वर चढले.
बाजाराची एकूण व्याप्ती नकारात्मक राहिली. १,५४१ कंपन्यांचे समभाग घसरले. १,३८१ कंपन्यांचे समभाग वाढले. ९३ कंपन्यांचे समभाग आदल्या सत्राच्या पातळीवर स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल ३,९९६.३१ कोटी रुपये राहिली. आदल्या सत्रात ती ३,0१९.४६ कोटी रुपये होती.

Web Title: The Bombay Stock Exchange fell by 160 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.