Lokmat Money > बिझनेस न्यूज > रोजगार हमीतील बोगसगिरीला लगाम जिल्हा प्रशासन: मजुरांचे आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करणार

रोजगार हमीतील बोगसगिरीला लगाम जिल्हा प्रशासन: मजुरांचे आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करणार

अहमदनगर: महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमुळे जिल्‘ात लाखो मनुष्य दिवस रोजगार निर्माण झाला आहे़ गावातील मागेल त्या ग्रामस्थाला काम आणि कामाच्या बदल्यात दाम, अशी ही योजना़ योजना चांगली असली तरी कागदोपत्री मजुरांची संख्या फुगवून मलई खाणार्‍यांचा शिरकाव झालाच, असा संशय प्रशासकीय यंत्रणेलाच आला आहे़ या बोगसगिरीला लागाम लावण्याच्या दिशेने प्रशासकीय यंत्रणेने वाटचाल सुरू केली असून, गावा-गावातील मजुरांचे आधारकार्ड जमविण्याची मोहीमच उघडली आहे़ त्यांचे जॉबकार्ड क्रमांक, बँक खाते आणि आधार क्रमांक जुळविले जाणार आहेत़ हे क्रमांक एकमेकांशी मॅच झाल्याची खात्री झाल्यानंतरच मजुरीचे वाटप होणार आहे़ त्यामुळे या बोगसगिरीला लगाम बसेल, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे़

By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST2014-12-02T23:30:25+5:302014-12-02T23:30:25+5:30

अहमदनगर: महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमुळे जिल्‘ात लाखो मनुष्य दिवस रोजगार निर्माण झाला आहे़ गावातील मागेल त्या ग्रामस्थाला काम आणि कामाच्या बदल्यात दाम, अशी ही योजना़ योजना चांगली असली तरी कागदोपत्री मजुरांची संख्या फुगवून मलई खाणार्‍यांचा शिरकाव झालाच, असा संशय प्रशासकीय यंत्रणेलाच आला आहे़ या बोगसगिरीला लागाम लावण्याच्या दिशेने प्रशासकीय यंत्रणेने वाटचाल सुरू केली असून, गावा-गावातील मजुरांचे आधारकार्ड जमविण्याची मोहीमच उघडली आहे़ त्यांचे जॉबकार्ड क्रमांक, बँक खाते आणि आधार क्रमांक जुळविले जाणार आहेत़ हे क्रमांक एकमेकांशी मॅच झाल्याची खात्री झाल्यानंतरच मजुरीचे वाटप होणार आहे़ त्यामुळे या बोगसगिरीला लगाम बसेल, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे़

Bogassagiri hinge district administration of employment guarantee: linking laborers' Aadhar card to bank account | रोजगार हमीतील बोगसगिरीला लगाम जिल्हा प्रशासन: मजुरांचे आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करणार

रोजगार हमीतील बोगसगिरीला लगाम जिल्हा प्रशासन: मजुरांचे आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करणार

मदनगर: महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमुळे जिल्ह्यात लाखो मनुष्य दिवस रोजगार निर्माण झाला आहे़ गावातील मागेल त्या ग्रामस्थाला काम आणि कामाच्या बदल्यात दाम, अशी ही योजना़ योजना चांगली असली तरी कागदोपत्री मजुरांची संख्या फुगवून मलई खाणार्‍यांचा शिरकाव झालाच, असा संशय प्रशासकीय यंत्रणेलाच आला आहे़ या बोगसगिरीला लागाम लावण्याच्या दिशेने प्रशासकीय यंत्रणेने वाटचाल सुरू केली असून, गावा-गावातील मजुरांचे आधारकार्ड जमविण्याची मोहीमच उघडली आहे़ त्यांचे जॉबकार्ड क्रमांक, बँक खाते आणि आधार क्रमांक जुळविले जाणार आहेत़ हे क्रमांक एकमेकांशी मॅच झाल्याची खात्री झाल्यानंतरच मजुरीचे वाटप होणार आहे़ त्यामुळे या बोगसगिरीला लगाम बसेल, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे़
ग्रामीण भागात मागेल त्याला काम मिळावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना सुरू केली़ या योजनेतंर्गत वैयक्तिक व सार्वजनिक स्वरुपाची कामे करणे शक्य झाले आहे़ रोजगाराबरोबरच काही भागाचा यामुळे चांगलाच कायापालट झाला़ अनेक गावांत माती नाला बांध, सिमेंट नाला बांध, बंधारे, फळबाग लागवड, सिंचन विहिरी, मत्स्यतळे यासारखी कामे करण्यात आली आहेत़ गावातील ग्रामस्थांना जॉबकार्डचेही वाटप करून झाले आहे़ जॉबकार्डधारकांनी कामाची मागणी केल्यास त्यांना त्यांच्याच गावात रोजगार उपलब्ध करून दिला जातो़ जिल्ह्यात असे २ लाख १८ हजार ८१ क्रियाशील मजूर आहेत़ या क्रियाशील मजुरांना पूर्वीच जॉबकार्डचे वाटप करण्यात आलेले आहे़ मजुरांनी जेवढे दिवस काम केले, तेवढ्या दिवसांची मजुरी त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची पध्दत आहे़ परंतु मजुरांची इतर माहिती उपलब्ध होत नसल्याने मजुरीचे दिवस कागदोपत्री वाढवून मलिदा लाटला जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत़ त्यामुळे गाव व वाड्यावस्त्यांवर पोहोचलेल्या योजनेतील ही बोगसगिरी थांबविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते़ प्रशासनाने यादृष्टीने पावले उचलली असून, मजुरांचा जॉबकार्ड क्रमांक, बँक खाते आणि आधार क्रमांक जुळविण्याची योजना आखली आहे़ प्रत्येक मजुराचे आधार क्रमांक जॉबकार्ड क्रमांकाशी जुळते किंवा नाही, याची खात्री केली जाणार आहे़ दोन्ही क्रमांक घेऊन ही यादी बँकेला दिली जाईल़ बँकेकडून दोन्ही क्रमांक बरोबर आहे की चूक, याची खात्री केली जाईल़ दोन्ही क्रमांक जुळल्यानंतरच मजुरांच्या खात्यावर त्यांच्या मजुरीची रक्कम जमा केली जाणार आहे़

Web Title: Bogassagiri hinge district administration of employment guarantee: linking laborers' Aadhar card to bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.