Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुख्यमंत्रिपदापेक्षा रक्ताचे नाते महत्त्वाचे !

मुख्यमंत्रिपदापेक्षा रक्ताचे नाते महत्त्वाचे !

सुप्रिया सुळे : अजित पवारांची पाठराखण

By admin | Updated: July 4, 2014 21:45 IST2014-07-04T21:45:11+5:302014-07-04T21:45:11+5:30

सुप्रिया सुळे : अजित पवारांची पाठराखण

Blood is more important than CM | मुख्यमंत्रिपदापेक्षा रक्ताचे नाते महत्त्वाचे !

मुख्यमंत्रिपदापेक्षा रक्ताचे नाते महत्त्वाचे !

प्रिया सुळे : अजित पवारांची पाठराखण
नाशिक : मुख्यमंत्रिपद तुम्हाला की अजितदादांना, या प्रश्नावर, मला भाऊ महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्रिपदावरून आमच्या घरात भांडण लावण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र मला मुख्यमंत्रिपदापेक्षा माझा भाऊ व रक्ताचे नाते खूप महत्त्वाचे आहे. आमच्यात या मुद्द्यावर अजिबात भांंडण होणार नाही, असा पुनरुच्चार राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या संस्थापक खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
राष्ट्रवादीच्या नाशिक विभागीय सोशल मीडिया कार्यशाळेसाठी त्या आल्या होत्या. ज्यांनी महिलांना ३३ टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला त्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर टीका करणे चुकीचे आहे. ज्यांना पक्ष सोडून जायचे त्यांनी स्वखुशीने जावे, त्यांना माझ्या वैयक्तिक शुभेच्छा आहेत. मात्र महिलांबाबत सर्वाधिक कार्य राष्ट्रवादीनेच केले आहे. आज महाराष्ट्रात स्त्रीभ्रूण हत्त्या व कुपोषण कमी झाले ते केवळ राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसच्या प्रयत्नांमुळेच. त्यामुळे पक्ष महिलांना डावलतो, हा आरोप चुकीचा आहे, असे त्यांनी नवी मुंबईतील मंदा म्हात्रे यांच्यासह काही महिला पदाधिकार्‍यांनी पक्ष नेतृत्वावर केलेल्या टीकेबद्दल बोलताना सांगितले.
अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने निवडणुकीला पक्ष कसा सामोरे जाणार, यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करणे सोपे असते; मात्र ते सिद्ध होणे महत्त्वाचे असते, असे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Blood is more important than CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.