वॉशिंग्टन : काळा पैसा विदेशात पाठविण्यात भारत चौथ्या स्थानावर आहे. २००४ ते २०१३ पर्यंत भारतातून दरवर्षी ५१ अब्ज डॉलर बाहेर जात असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. काळा पैसा विदेशात पाठविण्यात चीन पहिल्या, रशिया दुसऱ्या, तर मॅक्सिको तिसऱ्या स्थानावर आहे.
वॉशिंग्टनची एक सल्लागार संस्था ग्लोबल फायनान्शियल इंटेग्रिटीने हा अहवाल सादर केला आहे. यात म्हटले आहे की, भारताचे संरक्षण मंत्रालयाचे बजेट हे ५० अब्ज डॉलरपेक्षा कमी आहे. तथापि, दरवर्षी १३९ अब्ज डॉलर विदेशात पाठविणारा चीन पहिल्या, १०४ अब्ज डॉलर पाठविणारा रशिया दुसऱ्या, तर ५२.८ अब्ज डॉलर दरवर्षी विदेशात पाठविणारा मॅक्सिको तिसऱ्या स्थानावर आहे.
या अहवालात म्हटले आहे की, २०१३ च्या दरम्यान विकासाच्या प्रक्रियेतील, उभरत्या अर्थव्यवस्थेच्या या काळात काही देशांनी १,१०० अब्ज डॉलर एवढी रक्कम विदेशात जमा केली आहे. या अहवालात २०१३ पर्यंतचे आकडे उपलब्ध आहेत.
‘विकास प्रक्रियेच्या देशातील बेकायदेशीर आर्थिक प्रवाह : २००४-२०१३’ या अहवालात म्हटले आहे की, २०११ मध्ये बेकायदेशीर आर्थिक प्रवाह १,००० अब्ज डॉलरच्या पुढे गेला आहे. २०१३ मध्ये तो १,१०० अब्ज डॉलर झाला. २००४ च्या तुलनेत यात मोठी वाढ झाली आहे. २०१३ मध्ये वर्षभरात सर्वाधिक बेकायदेशीर पैसा २५८.६४ अब्ज डॉलर विदेशात पाठविण्यात आला आहे.
२0३0पर्यंत अवैध आर्थिक व्यवहार रोखा
जीएफआयचे अध्यक्ष रेमंड बेकर यांनी सांगितले की, या अहवालातून हे स्पष्ट होत आहे की, विकासाच्या प्रक्रियेतील देशातून बेकायदेशीर पैसा विदेशात जात आहे आणि ज्या देशांतून हा पैसा बाहेर जात आहे त्यांच्यासाठी ही सर्वात मोठी नुकसान करणारी समस्या बनली आहे.
बेकर म्हणाले की, या वर्षी संयुक्त राष्ट्रसंघात ‘अब्ज नाही हजार अब्ज’चा मंत्र केला गेला ज्यातून विकासासाठी आवश्यक निधीचा संकेत मिळतो. यात हे उल्लेखनीय आहे की, बेकायदेशीर पैशांवर लगाम लावणे याच धोरणाचा एक हिस्सा आहे. या अंतर्गत २०३० पर्यंत बेकायदेशीर आर्थिक प्रवाहावर लगाम लावण्याचे आवाहन केले गेले आहे.
विदेशात काळा पैसा; भारत चौथ्या स्थानी
काळा पैसा विदेशात पाठविण्यात भारत चौथ्या स्थानावर आहे. २००४ ते २०१३ पर्यंत भारतातून दरवर्षी ५१ अब्ज डॉलर बाहेर जात असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.
By admin | Updated: December 9, 2015 23:37 IST2015-12-09T23:37:56+5:302015-12-09T23:37:56+5:30
काळा पैसा विदेशात पाठविण्यात भारत चौथ्या स्थानावर आहे. २००४ ते २०१३ पर्यंत भारतातून दरवर्षी ५१ अब्ज डॉलर बाहेर जात असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.
