रज्यातील सर्वच मतदारसंघातभाजपचे स्वतंत्र जाहीरनामेमाधव भंडारी: विधानसभा निवडणूक तयारीचा आढावानागपूर : महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसताना भारतीय जनता पक्षाने राज्यातील सर्वच म्हणजे २८८ मतदारसंघात पक्षाचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीतील घटक पक्षांसाठी सुटणार्या मतदारसंघातही हा जाहीरनामा भाजप स्वतंत्रपणे काढणार आहे.प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी भंडारी नागपूरमध्ये आले होते. ते म्हणाले की, राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात पक्षाचा स्वतंत्र जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार असून त्यात पुढच्या पाच वर्षात भाजप कोणते काम करणार आहे त्याचा सर्वसाधारणपणे समावेश असेल. ज्या मतदारसंघात भाजपचा उमेदवार नसेल तेथे विकासाच्या प्रश्नांवर भाजप पुढच्या पाच वर्षात कोणते काम करणार आहे त्याचा अजेन्डा सादर करणार आहे. विशेष म्हणजे मतदारसंघातील जाहीरनामे तयार करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर टाकण्यात आली आहे. महायुतीच्या नेत्यांचा समावेश त्यात नसेल.प्रदेश भाजपचा वेगळा जाहीरनामा असेल. यासाठी नागरिकांना काही मुद्दे यासाठी सुचवायचे असतील तर ते त्यांनी सुचवावेत, ते योग्य असतील तर त्याचा समावेश केला जाईल. १ सप्टेंबरपर्यंत यासाठी मुदत आहे.यादी सप्टेंबरमध्ये जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटले. यासंदर्भात चर्चा सुरू आहे. युतीमध्ये घटक पक्षांची संख्या वाढल्याने जुन्या सूत्रानुसार जागा वाटप होणार नाही. पक्षातर्फे इच्छुकांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याचा अहवालही सादर करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यादी जाहीर होईल, असे भंडारी म्हणाले. यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी १५ ऑगस्टला यादी जाहीर होणार असल्याचे सांगितले होते हे येथे उल्लेखनीय. मोदींचा प्रभावकमी झाल्याची बाब भंडारी यांनी फेटाळून लावली. लोकसभा निवडणुकीत राज्यात २८८ पैकी २३१ विधानसभा मतदारसंघात महायुतीला आघाडी होती.पण त्यावर आम्ही अवलंबून राहणार नाही. आघाडी सरकारला जनता कंटाळली असून त्यांचा पराभव निश्चित आहे, असे भंडारी म्हणाले.प्रत्येक मतदारसंघातमंत्र्यांचे दौरेराज्यातील सर्वच मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि इतर राज्यातील मंत्री एक दिवस प्रचारासाठी येणार आहेत. विदर्भात मध्यप्रदेश सरकारचे मंत्री येतील. गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर त्यांचे दौरे होतील. काही केंद्रीय मंत्रीही राज्यात येतील, असे भंडारी म्हणाले.निवडणूक तयारीचा आढावाभंडारी यांनी आज नागपुरात पूर्व विदर्भातील मतदारसंघातील निवडणुकीचा आढावा घेतला. बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटन सचिव व्ही.सतीश, निवडणूक सनियंत्रण संमितीचे प्रमुख श्रीकांत भारतीय, प्रदेश संघटन सचिव रवींद्र भुसारी, खासदार हंसराज अहिर व पूर्व विदर्भातील सर्व आमदार उपस्थित होते.साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका अपेक्षित असल्याने त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. पक्षातर्फे राज्यपातळीवर निवडणूक संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. याच धर्तीवर राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक स्वतंत्र संनियंत्रन समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यांचे प्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांचे मेळावेही सुरू झाले आहेत. पत्रकार परिषदेला गिरीश व्यास व चंदन गोस्वामी उपस्थित होते. (प्रतिनिधी)चौकट -१तर मुख्यमंत्री काँग्रेसच्या कार्यक्रमात जाणार नाही का?पंतप्रधानांच्या उपस्थितीत सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणात नारेबाजी केल्याने मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या नागपूरच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असेल तर यापूर्वी नागपूर आणि कराड येथे झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात खुद्द मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच काँग्रेस नेत्यांनी त्यांना खडे बोल सुनावले. नारेबाजी केली. मग मुख्यमंत्री काँग्रेसच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार का? असा सवाल भंडारी यांनी केला. मुख्यमंत्र्यांचा बहिष्काराचा निर्णय चुकीचा पायंडा पाडणारा आहे. यातून त्यांच्या कोत्या मन:स्थितीचे दर्शन होते. सोलापूरच्या सभेत मुख्यमंत्र्यांनीच औचित्यभंग केला, असा आरोपही त्यांनी केला.चौकट -२पवार, तटकरेंना दोन महिन्यांनी कोण वाचवणार?कथित सिंचन घोटाळा प्रकरणात न्यायालयाच्या निर्देशानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या विरोधात चौकशी करण्याची परवानगी एसीबीने मागितली आहे. यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता राज्यपाल परवानगी देणार नाही. पण दोन महिन्यांनी सत्ताबदल झाल्यावर या नेत्यांना कोण वाचवणार असा सवाल माधव भंडारी यांनी केला.
राज्यातील सर्वच मतदारसंघात भाजपचे स्वतंत्र जाहीरनामे
राज्यातील सर्वच मतदारसंघात
By admin | Updated: August 23, 2014 22:03 IST2014-08-23T22:03:00+5:302014-08-23T22:03:00+5:30
राज्यातील सर्वच मतदारसंघात
