नपाणी : निपाणी येथील भाजपचे कार्यकर्ते रमेश नागेश जाजन्नावर (वय ३५) यांनी सावंतवाडी येथील एका लॉजवर आत्महत्या केली. ही घटना आज, शुक्रवारी घडली. याबाबतची माहिती सायंकाळी मिळताच निपाणीत खळबळ माजली आहे. मात्र, त्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकले नाही.गेल्या वर्षभरापासून रमेश हे विभक्त रहात होते. त्यांचे बंधू पुणे येथे असल्याने काही काळ ते तिथेही वास्तव्यास होते. त्यानंतर सातारा आणि महाबळेश्वर येथे ते नोकरीसाठी गेले होते. दरम्यानच्या काळात सावंतवाडी परिसरात ते मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करीत होते.रमेश जाजन्नावर यांना मधुमेहाचा त्रास असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. त्यामुळे नेमकी आत्महत्या कशासाठी केली, याचे गूढ कायम आहे. रात्री उशिरा शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह निपाणीत आणण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.-------------फोटो २२ एनपीएन ३ - रमेश जाजन्नावर
निपाणीतील भाजप कार्यकर्त्याची सावंतवाडीत आत्महत्या
निपाणी : निपाणी येथील भाजपचे कार्यकर्ते रमेश नागेश जाजन्नावर (वय ३५) यांनी सावंतवाडी येथील एका लॉजवर आत्महत्या केली. ही घटना आज, शुक्रवारी घडली. याबाबतची माहिती सायंकाळी मिळताच निपाणीत खळबळ माजली आहे. मात्र, त्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकले नाही.
By admin | Updated: August 22, 2014 23:32 IST2014-08-22T23:32:36+5:302014-08-22T23:32:36+5:30