रशीकांत देशमुख, मिरगणे, संजय क्षीरसागर यांना उमेदवारी सोलापूर: भाजपचे सहा उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत़ ‘शहर मध्य’चा तिढा अद्याप सुटलेला नाही़ सांगोल्यातून भाजपने र्शीकांत देशमुख यांना उमेदवारी दिली आहे तर बार्शीतून राजेंद्र मिरगणे यांना शिवसेनेतून ओढून भाजपने उमेदवारी दिली आह़े तर भाजपमधून शिवसेनेत गेलेल्या मात्र उमेदवारी न मिळालेल्या संजय क्षीरसागर यांना पुन्हा भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आह़े अक्कलकोटमधून विद्यमान आ़ सिद्रामप्पा पाटील, ‘शहर उत्तर’मधून विद्यमान आ़ विजयकुमार देशमुख, दक्षिण सोलापुरातून माजी खासदार सुभाष देशमुख यांना तर मोहोळमधून संजय क्षीरसागर यांना देखील स्वगृही परत घेऊन भाजपने उमेदवारी दिली आह़े बार्शी मतदारसंघातून राजेंद्र मिरगणे, सांगोल्यातून र्शीकांत देशमुख यांना भाजपने उमेदवारी दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी दिली़ ‘शहर मध्य’मधील तिढा शनिवारी सकाळी सुटण्याची चिन्हे आहेत़ इन्फो बॉक्सेस़़़- भाजप जिल्?ात सात जागा लढविणार आह़े उर्वरित चार जागा मित्रपक्षांसाठी आहेत़ ‘शहर मध्य’मधून नलिनी चंदेले, पांडुरंग दिड्डी, मोहिनी पत्की यांची चर्चा आहे. अद्याप या जागेचा उमेदवार भाजपने जाहीर केला नाही़- माजी महापौर महेश कोठे यांनी ‘शहर मध्य’मधून शिवसेनेतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे; मात्र ते आता ‘शहर उत्तर’मधून शिवसेनेतूनच इच्छुक आहेत त्यामुळे उद्या इथेही अर्ज दाखल होण्याची चिन्हे आहेत.
भाजपचे सहा उमेदवार जाहीर ‘मध्य’चा तिढा सुटेना
र्शीकांत देशमुख, मिरगणे, संजय क्षीरसागर यांना उमेदवारी
By admin | Updated: September 26, 2014 23:15 IST2014-09-26T23:15:07+5:302014-09-26T23:15:07+5:30
र्शीकांत देशमुख, मिरगणे, संजय क्षीरसागर यांना उमेदवारी
