Lokmat Money > बिझनेस न्यूज > बिटकॉइन सुसाट पुन्हा नवा उच्चांक! किंमत १,०६,४९३ डॉलरच्या पातळीवर

बिटकॉइन सुसाट पुन्हा नवा उच्चांक! किंमत १,०६,४९३ डॉलरच्या पातळीवर

जो बायडेन यांच्या प्रशासनाने क्रिप्टोकरन्सीबाबत फारसा उत्साह दाखवला नव्हता. याउलट डोनाल्ड ट्रम्प हे क्रिप्टोकरन्सीबाबत अनुकूल आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2024 07:54 IST2024-12-17T07:54:29+5:302024-12-17T07:54:40+5:30

जो बायडेन यांच्या प्रशासनाने क्रिप्टोकरन्सीबाबत फारसा उत्साह दाखवला नव्हता. याउलट डोनाल्ड ट्रम्प हे क्रिप्टोकरन्सीबाबत अनुकूल आहेत.

bitcoin hits new high gain price at 106 493 dollars | बिटकॉइन सुसाट पुन्हा नवा उच्चांक! किंमत १,०६,४९३ डॉलरच्या पातळीवर

बिटकॉइन सुसाट पुन्हा नवा उच्चांक! किंमत १,०६,४९३ डॉलरच्या पातळीवर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनने पुन्हा एकदा नवा उच्चांक केला असून, हे चलन सलग सातव्या सप्ताहात तेजीत असल्याचे दिसून आले. सोमवारी बिटकॉइच्या किमती ३ टक्के उसळल्या. त्यानंतर बिटकॉइनची किंमत १,०६,४९३ डॉलरच्या पातळीवर पोहोचली. हा बिटकॉइनचा सार्वकालिक उच्चांक ठरला. याआधीचा बिटकॉइनचा उच्चांक ५ डिसेंबर रोजी झाला होता. बिटकॉइनमधील तेजीबरोबरच इतर क्रिप्टोकरन्सीमध्येही तेजी दिसते. 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प हे निवडून आल्यापासून क्रिप्टोकरन्सी सातत्याने तेजीत आहे. क्रिप्टोकरन्सी क्षेत्रास मजबूत करण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दिले होते. त्यामुळे क्रिप्टो चलन तेजीत आहे, असे सूत्रांनी सांगितले. ट्रम्प निवडणूक जिंकले त्या दिवशीही बिटकॉइनने जोरदार उसळी घेतली होती. ब्लूमबर्गने तज्ज्ञाच्या हवाल्याने म्हटले आहे की, ट्रम्प यांच्या अनुकूल वक्तव्यामुळे क्रिप्टोकरन्सीची स्वीकारार्हता वाढण्याची अपेक्षा आहे. डिजिटल मालमत्तेशी संबंधित एक्सचेंज- ट्रेडेड फंडांतही तेजी आहे. कंपन्या बिटकॉइनमध्ये अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करीत आहेत.

स्वीकारार्हता वाढणार

सूत्रांनी सांगितले की, जो बायडेन यांच्या प्रशासनाने क्रिप्टोकरन्सीबाबत फारसा उत्साह दाखवला नव्हता. उलट किप्टोकरन्सीवर प्रतिबंध लावण्याची वक्तव्ये त्यांनी वेळोवेळी केली होती.  याउलट डोनाल्ड ट्रम्प हे क्रिप्टोकरन्सीबाबत अनुकूल आहेत. डिजिटल मालमत्तेसाठी अनुकूल नियामकीय आराखडा तयार केला जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.


 

Web Title: bitcoin hits new high gain price at 106 493 dollars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.