Lokmat Money > बिझनेस न्यूज > मालमत्ता कर भरा तरच मिळणार जन्म आणि मृत्यू दाखला *पालिकेच्या परिपत्रकामुळे स्थायीत गोंधळ *परिपत्रकातून जन्म, मृत्यू दाखल्याचा मुद्दा वगळला

मालमत्ता कर भरा तरच मिळणार जन्म आणि मृत्यू दाखला *पालिकेच्या परिपत्रकामुळे स्थायीत गोंधळ *परिपत्रकातून जन्म, मृत्यू दाखल्याचा मुद्दा वगळला

ठाणे।

By admin | Updated: July 4, 2014 21:45 IST2014-07-04T21:45:11+5:302014-07-04T21:45:11+5:30

ठाणे।

Birth and death certificates will be available only if property tax is paid * Resulted due to municipal circulars * Issue of death, death certificate issue excluded from circular | मालमत्ता कर भरा तरच मिळणार जन्म आणि मृत्यू दाखला *पालिकेच्या परिपत्रकामुळे स्थायीत गोंधळ *परिपत्रकातून जन्म, मृत्यू दाखल्याचा मुद्दा वगळला

मालमत्ता कर भरा तरच मिळणार जन्म आणि मृत्यू दाखला *पालिकेच्या परिपत्रकामुळे स्थायीत गोंधळ *परिपत्रकातून जन्म, मृत्यू दाखल्याचा मुद्दा वगळला

णे।
मुंब्य्रातून मालमत्ता कराची सुमारे ४० कोटींच्या थकबाकीची वसुली व्हावी, यासाठी ठाणे महापालिकेने जन्म किंवा मृत्यू दाखला हवा असेल तर मालमत्ता कर भरा, अशा आशयाचे परिपत्रक काढले आहे. परंतु, परिपत्रकातील याच मुद्यावरून शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी तो मुद्दा परिपत्रकातून वगळण्यासाठी प्रशासनाला धारेवर धरले. तसेच हे परिपत्रक काढणार्‍या संबंधित सहायक आयुक्तावर कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली. अखेर, प्रशासनाने परिपत्रकातील हा मुद्दा काढून टाकण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदस्य शांत झाले.
मुंब्य्रातून मालमत्ता करापोटी गेल्या पाच वर्षांपासूनची सुमारे ४० कोटींची थकबाकी आहे. या थकबाकीची वसुली करण्यासाठी मुंब्रा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सागर घोलप यांनी हे परिपत्रक काढले आहे. यात जन्म आणि मृत्यूच्या दाखल्याबरोबरच विविध स्वरूपाचे दाखले, नळजोडणी, नवीन कनेक्शन आदींचा यात उल्लेख करण्यात आला होता. परंतु, पालिकेच्या या परिपत्रकाचा समाचार स्थायी समिती सदस्यांनी घेतला. स्थानिक नगरसेवक सुधीर भगत यांनी जोपर्यंत एखादा मालमत्ताधारक मालमत्ता कर भरणार नाही, तोपर्यंत त्याला जन्म अथवा मृत्यू दाखला का दिला जाणार नाही, असा सवाल उपस्थित केला. विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, सभागृह नेते नरेश म्हस्के यांनीसुद्धा याला विरोध करून कोणत्या नियमानुसार, कोणत्या कायद्यानुसार हे परिपत्रक काढले, असा सवाल प्रशासनाला विचारला. यावर अतिक्रमण उपायुक्त के.डी. निपुर्ते यांनी जन्म-मृत्यूची नोंदणी केली जात असल्याचे सांगून केवळ मालमत्ताधारकांची थकबाकी किती आहे, ती भरली आहे की नाही, त्याची पावती दाखवली तरच त्यांना तो दाखला दिला जात असल्याचे स्पष्ट केले. तसेच ज्या सहायक आयुक्तांनी हे परिपत्रक काढले आहे, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी लावून धरली. अखेर, अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील यांनी या परिपत्रकातील हा मुद्दा वगळला जाईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे सभागृहातील गोंधळ शांत झाला.

Web Title: Birth and death certificates will be available only if property tax is paid * Resulted due to municipal circulars * Issue of death, death certificate issue excluded from circular

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.