Lokmat Money > बिझनेस न्यूज > मीटर बंद असूनही पाठविले बिल महावितरणची मनमानी : झोपडप˜ीवासीयांची होत आहे पिळवणूक

मीटर बंद असूनही पाठविले बिल महावितरणची मनमानी : झोपडप˜ीवासीयांची होत आहे पिळवणूक

नामदेव मोरे, नवी मुंबई : औद्योगिक वसाहतीमधील झोपडप˜ीधारकांना मीटर बंद असूनही मनमानी पद्धतीने वीज बिल पाठविले जात आहे. विजेचा वापर नसतानाही महिन्याला एक हजार रुपयांपेक्षा जास्त बिल दिले जात आहे. प्रथम सर्व बिल भरा, नंतर दुरुस्तीचे पाहू, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने महावितरणकडून गरिबांची पिळवणूक सुरू आहे.

By admin | Updated: December 2, 2014 00:36 IST2014-12-02T00:36:06+5:302014-12-02T00:36:06+5:30

नामदेव मोरे, नवी मुंबई : औद्योगिक वसाहतीमधील झोपडप˜ीधारकांना मीटर बंद असूनही मनमानी पद्धतीने वीज बिल पाठविले जात आहे. विजेचा वापर नसतानाही महिन्याला एक हजार रुपयांपेक्षा जास्त बिल दिले जात आहे. प्रथम सर्व बिल भरा, नंतर दुरुस्तीचे पाहू, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने महावितरणकडून गरिबांची पिळवणूक सुरू आहे.

Bill Mahavitaran's arbitrariness has been sent even though the meter is closed: Slum dwellers are being victimized | मीटर बंद असूनही पाठविले बिल महावितरणची मनमानी : झोपडप˜ीवासीयांची होत आहे पिळवणूक

मीटर बंद असूनही पाठविले बिल महावितरणची मनमानी : झोपडप˜ीवासीयांची होत आहे पिळवणूक

मदेव मोरे, नवी मुंबई : औद्योगिक वसाहतीमधील झोपडप˜ीधारकांना मीटर बंद असूनही मनमानी पद्धतीने वीज बिल पाठविले जात आहे. विजेचा वापर नसतानाही महिन्याला एक हजार रुपयांपेक्षा जास्त बिल दिले जात आहे. प्रथम सर्व बिल भरा, नंतर दुरुस्तीचे पाहू, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने महावितरणकडून गरिबांची पिळवणूक सुरू आहे.
झोपडप˜ीमधील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणार्‍या कल्पना गव्हाळे यांचे नेरूळ एमआयडीसीतील बोनसरीमध्ये घर आहे. बचत गटाच्या कामाचा व्याप वाढल्यामुळे चार वर्षांपासून त्या वाशीमध्ये राहण्यास गेल्या आहेत. तेव्हापासून येथील घर बंदच असते. पंधरा दिवसांतून किंवा महिन्यामधून एखाद्यावेळी बचत गटाच्या मीटिंगसाठी त्या या परिसरात येत असतात. घरातील विजेचा वापर नसला तरी महिन्याला येणारे बिल त्या नियमित भरत होत्या. परंतु तीन ते चार महिन्यांपासून घरातील वीजपुरवठा बंद झाला आहे. वीजबंद असली तरी महावितरण कर्मचारी पहिल्यापेक्षा कित्येक पटीने जास्त किमतीचे बिल पाठवत आहेत.
वीजबिलामध्ये चुका असून त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. इंदिरानगरमधील कार्यालयात गेले असता त्यांनी प्रथम वाशीमध्ये जाण्यास सांगितले. वाशी कार्यालयाने पुन्हा इंदिरानगरमध्ये जाण्याचा सल्ला दिला. पुन्हा संबंधित कार्यालयामध्ये गेल्यानंतर तुम्ही अगोदर तुम्हाला दिलेले बिल भरा, नंतर दुरुस्तीचे पाहून असे सांगण्यात आले. विजेचा वापर न करता एवढे बिल पाठविणे योग्य नसल्याविषयी सांगितल्यानंतर तुम्ही हवे तर पोलीस स्टेशनमध्ये आमच्याविरोधात तक्रार करा, अशी उत्तरे दिली व अखेर मीटरच काढून नेला आहे.
चौकट
दागिने विकून भरले होते बिल
गव्हाळे यांनी मीटर घेतल्यानंतरही सुरवातीला महावितरणने काही महिने बिलच दिले नव्हते. कार्यालयात गेल्यानंतरही बिल येईल, काळजी करू नका, असे सांगितले व नंतर एकदम १४ हजार रुपयांचे बिल पाठविले होते. विनंत्या करूनही काहीच उपयोग झाला नसल्यामुळे कानातील सुवर्णाची कर्णफुले विकून व अपंग मुलीच्या नावावर बँकेत ठेवलेले पैसे काढून बिल भरल्याचा अनुभव गव्हाळे यांनी सांगितला.

चौकट
अनेक नागरिकांना त्रास
झोपडप˜ीमध्ये अनेक नागरिकांना मनमानीपणे बिल पाठविले जात आहे. नागरिकांनी महावितरण कार्यालयात कितीही हेलपाटे घातले तरी त्यांची बाजू ऐकून घेतली जात नाही. यामुळे हा अन्याय सहन करण्यापेक्षा दुसरा उपाय नसतो, असे मत येथील रहिवाशांनी व्यक्त केले आहे.
----
महावितरणचा भोंगळ कारभार
मे महिन्यामध्ये २१८ रुपये बिल पाठविले होते. जूनमध्ये २८५ रुपयांचे बिल आले होते. परंतु सप्टेंबरमध्ये मीटरबंद असतानाही ११९५ व ऑक्टोबरमध्ये १२१३ रुपये बिल पाठविण्यात आले आहे. थकबाकीसह बिलाची रक्कम तब्बल २९०० एवढी झाली आहे. वापर नसतानाही एवढे बिल पाहून गव्हाळे कुटंुबीयांना धक्का बसला आहे.
फोटो
०१एमआयडीसी
विज मिटर काढून नेला असल्याचे चित्र

Web Title: Bill Mahavitaran's arbitrariness has been sent even though the meter is closed: Slum dwellers are being victimized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.