Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्सची ५ वर्षांतील सर्वांत मोठी उसळी

सेन्सेक्सची ५ वर्षांतील सर्वांत मोठी उसळी

झर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदरात कपात केल्यामुळे शेअर बाजारात अभूतपूर्व तेजी आली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने गेल्या ५ वर्षांतील सर्वांत मोठी उसळी घेत

By admin | Updated: January 16, 2015 05:36 IST2015-01-16T05:36:06+5:302015-01-16T05:36:06+5:30

झर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदरात कपात केल्यामुळे शेअर बाजारात अभूतपूर्व तेजी आली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने गेल्या ५ वर्षांतील सर्वांत मोठी उसळी घेत

The biggest rally in the 5-year Sensex | सेन्सेक्सची ५ वर्षांतील सर्वांत मोठी उसळी

सेन्सेक्सची ५ वर्षांतील सर्वांत मोठी उसळी

मुंबई : रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदरात कपात केल्यामुळे शेअर बाजारात अभूतपूर्व तेजी आली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने गेल्या ५ वर्षांतील सर्वांत मोठी उसळी घेत ७२८.७३ अंकांची वाढ नोंदविली आहे. त्याबरोबर सेन्सेक्स पुन्हा एकदा २८ हजार अंकांच्या वर गेला आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी पतधोरणाचा आढावा जाहीर करताना अचानक पुनर्खरेदी व्याजदर ८ टक्क्यांवरून ७.७५ टक्के केला. व्याजदरात बदल होण्याची शक्यता नाही, अशा बातम्या कालपर्यंत येत होत्या. त्यामुळे आजची कपात ही शेअर बाजाराच्या दृष्टीने अचानक झालेला धनलाभच ठरली.
मुंबई शेअर बाजारातील सर्व १२ क्षेत्रांत खरेदीचा जोर दिसून आला. सर्व श्रेणींतील निर्देशांक 0.४४ टक्के ते ७.९९ टक्के या दरम्यान वाढले.
बीएसई सेन्सेक्स सकाळी २७,८३१.१६ अंकांवर उघडला होता. त्यानंतर तो लगेच २८,१९४.६१ अंकांवर पोहोचला. दिवस अखेरीस २८,0७५.५५ अंकांवर बंद झाला. ७२८.७३ अंक अथवा २.६६ टक्के वाढ सेन्सेक्सने नोंदविली. १८ मे २00९ रोजी सेन्सेक्स २,११0.७९ अंकांनी वाढला होता. त्या खालोखाल आजच्या वाढीची नोंद झाली आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा एनएसई निफ्टी ८,४२४.५0 अंकांवर उघडला होता. नंतर तो ८,५२७.१0 अंकांपर्यंत वर चढला. दिवसअखेरीस ८,४९४.१५ अंकांवर बंद झाला. २१६.६0 अंक अथवा २.६२ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली. निफ्टीमधील ५0 पैकी ४६ कंपन्यांचे समभाग वाढले.

Web Title: The biggest rally in the 5-year Sensex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.