लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : येत्या काळात भारतात मोठ्या आर्थिक सुधारणा होतील या आशेने गेल्या सहा महिन्यांमध्ये परकीय गुंतवणूकदारांनी २३ अब्ज डॉलर्स गुंतवले आहेत. गेल्या वर्षी याच काळात परकीय गुंतवणूक १.२ अब्ज डॉलर्स एवढी होती.
२०१९ च्या निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी सरकार अखेरच्या दोन वर्षांत विकासाच्या प्रक्रिया आणि आर्थिक सुधारणा गतिमान करेल, असा अंदाज आहे. मॉर्निंगस्टार इंडियाचे वरिष्ठ विश्लेषक
हिमांशू श्रीवास्तव म्हणाले की, वस्तू व सेवा कर आणि मान्सून चांगला राहण्याचा अंदाज यामुळे गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याच्या आशा आहेत.
जानेवारी ते जून २०१७ या काळात विदेशी गुंतवणूकदारांनी ५३,३५४ कोटी रुपयांची (८.२ अब्ज डॉलर) गुंतवणूक केली. याच काळात त्यांनी कर्ज बाजारात ९४,१९९ कोटी (१४.५ अब्ज डॉलर) गुंतवणूक केली गेली. अशा प्रकारे त्यांनी एकूण १,४७,५५३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड
ट्रम्प यांच्याकडून धोरणात झालेला बदल आणि नोटाबंदीनंतर रुळावर आलेली आर्थिक स्थिती हेही प्रमुख मुद्दे राहिले.
>आगामी काळात मोठी संधी
जीएसटीची अंमलबजावणी आणि मान्सूनची समाधानकारक सुरुवात यामुळे आर्थिक आघाड्यांवर उत्साह असल्याचे दिसून येत आहे. मार्चमधील विदेशी गुंतवणूक उत्साह वाढविणारी म्हणजेच ७५ हजार कोटी रुपयांची होती. विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेले चांगले यश सकारात्मक संदेश होता. पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांत भाजपाने चार राज्यांत सत्ता स्थापन केली. आगामी काळातही आव्हाने आहेत; पण सध्याचा जो कल आहे त्यात फारसा बदल होणार नाही. शेअर बाजार आणि रुपयाही उच्च पातळीवर आहे.
परकीय गुंतवणूकदारांना भारताकडून मोठ्या आशा
येत्या काळात भारतात मोठ्या आर्थिक सुधारणा होतील या आशेने गेल्या सहा महिन्यांमध्ये परकीय गुंतवणूकदारांनी २३ अब्ज डॉलर्स गुंतवले आहेत
By admin | Updated: July 10, 2017 00:07 IST2017-07-10T00:07:23+5:302017-07-10T00:07:23+5:30
येत्या काळात भारतात मोठ्या आर्थिक सुधारणा होतील या आशेने गेल्या सहा महिन्यांमध्ये परकीय गुंतवणूकदारांनी २३ अब्ज डॉलर्स गुंतवले आहेत
