वमा सप्ताह : नवीन योजनेचाही प्रारंभनाशिक : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या नाशिक विभागाने गतवर्षात चांगली कामगिरी केली असून, येत्या वर्षातही अशीच कामगिरी केली जाईल, असा विश्वास नाशिक विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक डी. साहू यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. सोमवारपासून सुरू झालेल्या विमा सप्ताहात राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे नवीन सुरू झालेल्या विमा योजनेची माहितीही दिली.भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या स्थापनेला ५८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सुरू करण्यात आलेल्या जीवन शगुन या नव्या योजनेची माहितीही साहू यांनी दिली. ८ ते ४५ वर्षे वयोगटासाठी असलेल्या या योजनेत एकरकमी प्रिमीयम असेल. पॉलिसीच्या कालावधीत विमेदाराला जोखीम संरक्षण मिळणार आहे. त्याचप्रमाणे निश्चित लाभही मिळणार आहे.विमा सप्ताहामध्ये प्रत्येक शाखेमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही साहू यांनी दिली. नाशिक विभागातील चार जिल्ांमध्ये २० शाखा कार्यरत असून, १२०० कर्मचारी आणि १४ हजार एजंट कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले. गतवर्षात विभागाने ३ लाख ८१ हजार पॉलिसींची विक्री केली असून, ३०८.५९ कोटी रुपयांचा प्रथम हप्ता जमा केल्याचेही त्यांनी सांगितले. जीवन रक्षक या नव्यानेच आलेल्या योजनेच्या पहिल्याच दिवशी विभागातून दोन हजार पॉलिसी काढून देशात प्रथम क्रमांक मिळविल्याचेही साहू यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला विभागाचे विपणन व्यवस्थापक आशुतोष प्रसाद, अशोक गायधनी, जे. के. तेलंगी, एम. एस. पंडित, दीपक कुलकर्णी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (वाणिज्य प्रतिनिधी)इन्फो.....विशेष पुनरुज्जीवन मोहीमआयुर्विमा महामंडळातर्फे बंद पडलेल्या पॉलिसींच्या पुनरुज्जीवनाची विशेष मोहीम सध्या राबविली जात आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. या काळात पॉलिसींचे पुनरुज्जीवन करणार्यांना व्याजात सवलत मिळणार असून, काही वैद्यकीय चाचण्यांमध्येही सूट दिली जाणार आहे. या योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहनही साहू यांनी केले आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळाची चांगली कामगिरी
विमा सप्ताह : नवीन योजनेचाही प्रारंभ
By admin | Updated: September 2, 2014 00:33 IST2014-09-02T00:33:33+5:302014-09-02T00:33:33+5:30
विमा सप्ताह : नवीन योजनेचाही प्रारंभ
