मुंबई : हिंदी भाषेचा वापर वाढविण्यासाठी आणि गुंतवणूकदारांशी त्यांच्या भाषेत संपर्क साधण्यासाठी सेबी (सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया) प्रयत्न करणार आहे. सेबी आपल्या विविध दस्तावेजांचा हिंदी भाषेत अनुवाद करण्यासाठी व्यावसायिक मंडळ तयार करणार आहे. केंद्र सरकार त्याच्या अधिकृत भाषा धोरणानुसार ही पावले उचलत आहे.
सेबीच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी (विशेषत: हिंदी भाषिक) आपल्या आदेशात पत्रव्यवहारात राजभाषा हिंदीला प्राधान्य द्या, असे लिहायला सुरुवात केली आहे.
हिंदी आणि इंग्रजीच्या व्यावसायिक अनुवादकांना यासाठी बोलावण्यात आले आहे. या अनुवादकांना भांडवल बाजारातील शब्द आणि संकल्पना यांची माहिती असावी. या अनुवादकांनी ठराविक वेळेत व यथायोग्य अनुवाद पूर्ण करावा अशी अपेक्षा आहे.
(वृत्तसंस्था)
सेबी करणार हिंदी भाषेत व्यवहार
हिंदी भाषेचा वापर वाढविण्यासाठी आणि गुंतवणूकदारांशी त्यांच्या भाषेत संपर्क साधण्यासाठी सेबी (सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया) प्रयत्न करणार आहे
By admin | Updated: October 7, 2014 02:40 IST2014-10-07T02:40:34+5:302014-10-07T02:40:34+5:30
हिंदी भाषेचा वापर वाढविण्यासाठी आणि गुंतवणूकदारांशी त्यांच्या भाषेत संपर्क साधण्यासाठी सेबी (सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया) प्रयत्न करणार आहे
