Lokmat Money > बिझनेस न्यूज > पुण्याच्या पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला

पुण्याच्या पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला

पांडवगड : एक पर्यटक सातशे फूट दरीत कोसळून गंभीर जखमी

By admin | Updated: September 13, 2014 22:59 IST2014-09-13T22:59:58+5:302014-09-13T22:59:58+5:30

पांडवगड : एक पर्यटक सातशे फूट दरीत कोसळून गंभीर जखमी

Bees attack tourists in Pune | पुण्याच्या पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला

पुण्याच्या पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला

ंडवगड : एक पर्यटक सातशे फूट दरीत कोसळून गंभीर जखमी
वाई : पुण्याहून पांडवगड, ता. वाई येथे फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केला. पर्यटकांमध्ये उडालेल्या धावपळीत एक पर्यटक तब्बल सातशे फूट दरीत कोसळला. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर महाबळेश्वरच्या जवानांनी दरीतून वर काढून त्याला तत्काळ सातार्‍याकडे हलविले.
महेश जोशी (वय ४८, रा. वाकडवाडी, पुणे) असे जखमी पर्यटकाचे नाव आहे. पुण्यातील एका कंपनीचे ४१ कर्मचारी शनिवारी सुटी असल्याने पांडवगडला फिरण्यासाठी आले होते. पांडवगड चढत असताना तेथे असणार्‍या मधाच्या पोळ्याला पर्यटकांचा धक्का लागला. त्यामुळे मधमाश्या खवळल्या आणि पर्यटकांवर तुटून पडल्या. या प्रकारामुळे पर्यटकांमध्ये एकच धांदल उडाली आणि ते सैरावैरा धावू लागले.
पांडवगड हा अतिदुर्गम आहे. याठिकाणी दळणवळसाठी रस्त्यांची सोय नाही. रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे आणि दरीचा अंदाज न आल्याने महेश जोशी हे दरीत कोसळले. याची माहिती इतर साथीदारांना समजल्यानंतर सर्वजण दरीजवळ आले. जोशी यांना त्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र दरी खोल असल्यामुळे कोणालाही उतरता आले नाही. त्यामुळे महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले. या जवानांनी काही तासांतच जोशी यांना दरीतून वर काढले. जोशी यांच्या मणका आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तत्काळ सातार्‍यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bees attack tourists in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.