नवी दिल्ली : जर तुम्ही लखनौमध्ये राहत असाल आणि नवीन कार खरेदी करीत असाल किंवा गुवाहाटीतील एखाद्या मॉलमध्ये खरेदीचा विचार करीत असाल अथवा तुम्ही कोचीमध्ये आपल्या स्वप्नातील काही गोष्टी पूर्ण करण्यासाठी मोठी रक्कम खर्च करीत असाल, तर प्राप्तिकर खात्यासाठी तुम्ही महत्त्वाची व्यक्ती ठरू शकता.
देशातील आठ शहरांत प्राप्तिकर खात्याकडून प्रायोगिक तत्त्वावर एक उपक्रम राबविण्यात येत असून, गुप्तचर विभाग आणि गुन्हे अन्वेषण विभागाला या शहरांमध्ये मोठी रक्कम खर्च करणाऱ्या व्यक्तींची माहिती एकत्रित करण्यास सांगण्यात आले आहे.
चेन्नई, कोलकाता, पुणे, लखनौ आणि भोपाळ या शहरातूनही अशा प्रकारची माहिती जमा केली जाणार आहे. प्राप्तिकर खात्याकडून जी शहरे निवडण्यात आली आहेत त्यासाठी कोणतेही निकष ठरविण्यात आलेले नाहीत. गेल्या आठवड्यात अर्थमंत्री अरुण जेटली आणि प्राप्तिकर खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला होता.
कराचे जाळे विस्तारण्याबरोबरच करचुकवेगिरीला आळा घालणे हा या योजनेमागचा प्रमुख हेतू आहे. अशा तऱ्हेचे उपक्रम प्राप्तिकर खात्याला नवीन नाहीत. गेल्या आर्थिक वर्षात अशाच योजनांतून पुढे आलेली करचुकवणाऱ्यांची संख्या मोठी होती.
अर्बन को-आॅपरेटिव्ह बँक अथवा पतसंस्थांमध्ये बचत खात्यात पाच लाखांहून अधिक रक्कम जमा करणाऱ्या, तसेच खात्यात या संस्थांकडून दहा हजारांपेक्षा अधिक व्याज जमा झालेल्या व्यक्तींची माहिती २०१० पासून सलग तीन आर्थिक वर्षात एकत्र करण्यात आली होती.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
सावधान... प्राप्तिकर खात्याचे तुमच्या मोठ्या खरेदीवर आहे लक्ष
जर तुम्ही लखनौमध्ये राहत असाल आणि नवीन कार खरेदी करीत असाल किंवा गुवाहाटीतील एखाद्या मॉलमध्ये खरेदीचा विचार करीत असाल
By admin | Updated: July 31, 2014 03:21 IST2014-07-31T03:21:57+5:302014-07-31T03:21:57+5:30
जर तुम्ही लखनौमध्ये राहत असाल आणि नवीन कार खरेदी करीत असाल किंवा गुवाहाटीतील एखाद्या मॉलमध्ये खरेदीचा विचार करीत असाल
