मुंबई : २५ मार्च ते १ एप्रिल या काळात सुट्यांतही कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने सर्व एजन्सी बँकांना दिले आहेत. सर्व सरकारी बँका आणि आणि काही खासगी बँकांचा एजन्सी बँकांत समावेश होतो. आर्थिक वर्षाखेरीस नागरिकांना करभरणा करणे तसेच अन्य सरकारी देणी देणे सुलभ व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, सरकारी देणी आणि भरणा करण्याची सोय व्हावी, यासासाठी सर्व एजन्सी बँकांना २५ मार्च ते १ एप्रिल या काळात कामकाज सुरू ठेवण्यास सांगण्यात आले आहे. या काळात बँका संपूर्ण दिवसभर उघड्या राहतील. या काळातील शनिवार, रविवार आणि इतर सर्व सुट्या बँकांनी रद्द कराव्यात, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.
रिझर्व्ह बँकेचे या व्यवहाराशी संबंधित विभागही या काळात दिवसभर सुरू राहणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
१ एप्रिलपर्यंत बँका रोजच सुरू राहणार
२५ मार्च ते १ एप्रिल या काळात सुट्यांतही कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने सर्व एजन्सी बँकांना दिले आहेत
By admin | Updated: March 26, 2017 03:42 IST2017-03-26T03:42:01+5:302017-03-26T03:42:14+5:30
२५ मार्च ते १ एप्रिल या काळात सुट्यांतही कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने सर्व एजन्सी बँकांना दिले आहेत
