औरंगाबाद : दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वेतनवाढीच्या करारावर काहीच निर्णय होत नसल्याच्या निषेधार्थ भारताच्या पश्चिम विभागातील राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी ५ डिसेंबर रोजी संप करणार आहेत. या दिवशी बँका बंद असतील.
युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्स या बँकिंग क्षेत्रातील नऊ संघटनांच्या शिखर संघटनेतर्फे वेतनवाढीच्या कराराच्या मागणीसाठी गेल्या २ डिसेंबरपासून चार दिवस विभागवार साखळी संप सुरू करण्यात आला आहे. त्याअंतर्गत ५ डिसेंबर रोजी पश्चिम विभागात संप केला जाईल. औरंगाबाद येथे शुक्रवारी भव्य दुचाकी फेरी हैदराबाद बँकेच्या झोनल आॅफिसपासून (सिडको) सकाळी १०.३० वाजता निघेल व सिडको बसस्टँड सिग्नल- सेव्हन हिल- आकाशवाणी चौक- मोंढा नाका या मार्गाने जाऊन तिचा समारोप बँक आॅफ इंडियापाशी (हॉटेल अमरप्रीत, जालना रोड) होईल. समारोपानंतर मोठ्या प्रमाणावर जोरदार निदर्शने केली जातील.
बँक कर्मचाऱ्यांनी स्टेट बँक आॅफ हैदराबादच्या झोनल कार्यालयापाशी सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सतर्फे जगदीश भावठाणकर, देवीदास तुळजापूरकर, सुनील शिंदे, प्रमोद बेंडे, महेश गोसावी, आनंद जोशी व पिंगळीकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
तत्पूर्वी, साखळी संप आंदोलनादरम्यान बुधवारी बँक कर्मचाऱ्यांनी उत्तर विभागात संप केला. या दरम्यान आंदोलकांनी ठिकठिकाणी तीव्र निदर्शने केली. बँक कर्मचारी हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करताना दिसून आले.
पश्चिम विभागातील बँकांचा उद्या संप
दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वेतनवाढीच्या करारावर काहीच निर्णय होत नसल्याच्या निषेधार्थ भारताच्या पश्चिम विभागातील राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी ५ डिसेंबर रोजी संप करणार आहेत.
By admin | Updated: December 4, 2014 00:19 IST2014-12-04T00:19:29+5:302014-12-04T00:19:51+5:30
दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वेतनवाढीच्या करारावर काहीच निर्णय होत नसल्याच्या निषेधार्थ भारताच्या पश्चिम विभागातील राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी ५ डिसेंबर रोजी संप करणार आहेत.
