नवी दिल्ली : पतमर्यादा वाढविण्यासाठी सिंडिकेट बँकेत झालेल्या लाच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बँकांनी कर्ज मंजूर करताना अधिक काळजी घेतली पाहिजे, असे केंद्रीय दक्षता आयोगाचे म्हणणे आहे.
काही बँका कर्ज मंजूर करताना नियमांचे पालन करीत नाहीत, असे या आयोगाने अर्थ मंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे बुडीत कर्ज मार्च २०१४ अखेर २.१६ लाख कोटी रुपयांपर्यंत गेले आहे. २०१३-२०१४ या आर्थिक वर्षात हे कर्ज तब्बल ३९ टक्क्यांनी वाढले आहे. काही महिन्यांपूर्वी आम्ही धोरण लकव्याबद्दल बोलत होतो. जर आम्ही दक्षतेचे सगळे नियम पाळले गेले आहेत की नाही याची व्यावसायिक अंगाने तपासणी केली तर कर्ज लकवा बघायला मिळेल, असे आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले.
२००९ च्या आॅक्टोबरपासून प्रथमच वार्षिक पतवृद्धी १० टक्क्यांच्या खाली आली आहे. ही वृद्धी २०१३-२०१४ वर्षाच्या तुलनेत गेल्या ५ सप्टेंबरपर्यंत ९.६८ टक्के होती. २०१४-२०१५ च्या दुसऱ्या सहा महिन्यांत औद्योगिक वृद्धीला वेग आल्यानंतर ही पतवृद्धी गती घेईल अशी रिझर्व्ह बँकेला अपेक्षा आहे. बँकिंग हा प्रेरक शक्ती असलेला व्यवसाय आहे हे समजून घेतले पाहिजे त्यामुळे विशिष्ट निर्णय हे कागदपत्रांची पूर्तता करूनच घेतले पाहिजेत, असे सार्वजनिक क्षेत्रातील कार्यकारी अधिकाऱ्याने सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
बँकांनी कर्ज देताना नियम पाळलेच पाहिजेत- सीव्हीसी
तमर्यादा वाढविण्यासाठी सिंडिकेट बँकेत झालेल्या लाच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बँकांनी कर्ज मंजूर करताना अधिक काळजी घेतली
By admin | Updated: October 7, 2014 02:45 IST2014-10-07T02:45:21+5:302014-10-07T02:45:21+5:30