नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या काळात फसवणुकीच्या यादीत आयसीआयसीआय बँक आघाडीवर राहिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील एसबीआय दुसऱ्या स्थानावर आहे. रिझर्व्ह बँकेच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेने अर्थ मंत्रालयाला दिलेल्या आकडेवारीनुसार फसवणुकीच्या या प्रकरणांमध्ये बँक कर्मचारीही सहभागी असल्याचे दिसून येत आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात आयसीआयसीआय बँकेत एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिकचे फसवणुकीचे ४५५ प्रकरणे समोर आली आहेत. एसबीआयमध्ये ४२९ व स्टँडर्ड चार्टर्डमध्ये २४४, एचडीएफसी बँकेत २३७ प्रकरणे समोर आली आहेत. याच काळात एक्सिस बँकेत १८९, बँक आॅफ बडोदामध्ये १७६ आणि सिटी बँकेत फसवणुकीचे १५० प्रकरणे समोर आली आहेत.
या फसवणुकीत सर्वाधिक मूल्याचे म्हणजेच २२३६. ८१ कोटी रुपयांचे प्रकरणे एसबीआयने नोंदविले आहेत. पंजाब नॅशनल बँकेने २२५०.३४ कोटी रुपये तर एक्सिस बँकेत १९९८.४९ कोटी रुपयांचे फसवणुकीचे प्रकरणे समोर आली आहेत. फसवणुकीच्या या प्रकरणात बँकेच कर्मचारीही सहभागी असल्याचे दिसून आले आहे. एसबीआयचे ६४ कर्मचारी, एचडीएफसीचे ४९ आणि एक्सिस बँकेचे ३५ कर्मचारी यात सहभागी असल्याचे दिसून आले आहे. एप्रिल ते डिसेंबर या काळात सरकारी आणि खासगी बँकांचे ४५० कर्मचारी फसवणुकीच्या प्रकरणात सहभागी असल्याचे आढळून आले आहे. या काळात १७,७५०.२७ कोटी रुपयांचे फसवणुकीचे ३,८७० प्रकरणे समोर आली आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
फसवणुकीत बँका आघाडीवर
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या काळात फसवणुकीच्या यादीत आयसीआयसीआय बँक आघाडीवर राहिली आहे
By admin | Updated: March 13, 2017 00:34 IST2017-03-13T00:34:08+5:302017-03-13T00:34:08+5:30
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या काळात फसवणुकीच्या यादीत आयसीआयसीआय बँक आघाडीवर राहिली आहे
