अथेन्स : ग्रीसमधील बँका तीन आठवड्यांच्या खंडानंतर सोमवारी पुन्हा सुरू झाल्या. मात्र खातेदारांना एका दिवसात ६० युरो, म्हणजेच आठवड्याला केवळ ४२० युरोच खात्यामधून काढण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. या बंधनांबरोबर आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी करवृद्धीही करण्यात आलेली
आहे.
सोमवारी बँकांनी व्यवहार सुरू केल्याचे समजल्यावर पैसे घेण्यासाठी अथेन्समध्ये बँकांच्या बाहेर खातेदारांनी रांगा लावल्याचे चित्र होते. त्याचप्रमाणे संभाव्य गर्दीचा अंदाज घेऊन तशी सुरक्षा व्यवस्थादेखील पुरविण्यात आली. या ग्राहकांना धनादेश वटवून पैसे हातात मिळणार नसून धनादेशाचे पैसे फक्त खात्यातच जमा करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांना परदेशात कॅश कार्डावरून पैसे काढता येणार नाहीत, या कार्डावरून केवळ वस्तू खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे. अशा अनेक अटी खातेदारांवर लादल्या असल्या तरी नवी खाती उघडण्यावर आणि निष्क्रिय (डॉर्मंट) खाती पुन्हा सुरू करण्यावर कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही. खातेदारांना लॉकर्सही वापरता येणार आहेत. २९ जून रोजी बँका बंद झाल्यामुळे कचाट्यात सापडलेल्या नोकरदार आणि निवृत्तीवेतनधारकांना आता थोडासा दिलासा मिळाला आहे.
ग्रीसमध्ये बँका पुन्हा झाल्या सुरू
ग्रीसमधील बँका तीन आठवड्यांच्या खंडानंतर सोमवारी पुन्हा सुरू झाल्या. मात्र खातेदारांना एका दिवसात ६० युरो, म्हणजेच आठवड्याला केवळ ४२० युरोच
By admin | Updated: July 21, 2015 00:13 IST2015-07-21T00:13:43+5:302015-07-21T00:13:43+5:30
ग्रीसमधील बँका तीन आठवड्यांच्या खंडानंतर सोमवारी पुन्हा सुरू झाल्या. मात्र खातेदारांना एका दिवसात ६० युरो, म्हणजेच आठवड्याला केवळ ४२० युरोच
