नवी दिल्ली : आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागड्या कार खरेदी करू नका, असा इशारा वित्त मंत्रालयाने सरकारी बँकांना दिला आहे. विशेष म्हणजे यातील काही मोटारी कमी किमतीत कर्मचाऱ्यांना विकल्या जात असल्याचे उघडकीस आल्यानंतर वित्त मंत्रालयाने हा इशारा दिला आहे.
मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने (डीएफएस) सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांना पत्र लिहिले आहे. दक्षता आयोगानेही बँका महागड्या कार खरेदी करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. बँक प्रमुखांना लिहिलेल्या पत्रात दक्षता आयोगाच्या या टिपणीचा उल्लेख आहे. बँकांच्या प्रशासनाने अनावश्यक खर्च टाळून कमी खर्च करण्यावर भर द्यावा.
खर्च हा योग्य कारणासाठीच असला पाहिजे. त्यावर बँकांच्या प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे, त्यानुसार काही बँकांना वाहनांच्या किमती घटल्या असतील तर त्या खरेदी करण्याची मुभा आहे. त्यामुळे वाहनांवरील खर्च तर्कसंगत असला पाहिजे. काही अधिकारी सेवानिवृत्तीजवळ आले असताना बँका महागड्या कार खरेदी करतात आणि नंतर कमी किमतीत त्या अधिकाऱ्यांना त्याची विक्री केली जाते, हा एक चिंतेचा विषय आहे. या पत्रात पुढे म्हटले आहे की, जुन्या कारची विक्री आणि नवीन कारची खरेदी बाजारात असलेल्या दराप्रमाणे असली पाहिजे.
सरकारी बँकांच्या अग्रिम करात घट
- सरकारी बँकांच्या थकीत कर्जाची आकडेवारी वाढत असल्याचा परिणाम बँकांच्या कामगिरीवरही होताना दिसत असून चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाही करता सरकारी बँकांनी भरणा केलेल्या अग्रिम कराच्या रकमेत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे दिसून आले आहे.
- उपलब्ध माहितीनुसार, देशातील सगळ्यात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने गेल्यावर्षीच्या याच कालावधीत अग्रिम करापोटी भरणा केलेल्या १७४९ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा अवघ्या ६८७ कोटी रुपयांचा कर भरणा केला आहे. टक्केवारीत ही घट ६०.७ टक्के इतकी आहे. तर बँक आॅफ इंडिया व सेन्ट्रल बँक आॅफ इंडियाच्या कर भरण्यात ४० टक्क्यांची घट नोंदली गेली आहे.
- सरकारी बँकांच्या अग्रिम कराच्या रकमेत घट झाली असली तरी याबाबतीत खाजगी बँकांची कामगिरी मात्र उत्तम ठरली आहे. एचडीएफसी बँकेने मार्च २०१५ मध्ये अग्रिम करापोटी १४०० कोटी रुपयांचा भरणा केला आहे तर यंदाच्या वर्षी १६०० कोटी रुपयांचा भरण करत वाढ नोंदविली आहे. तर आयसीआयसीआय बँकेच्या अग्रिम कराच्या रकमेत गेल्यावर्षीच्या याच कालावधीतील १२९५ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा १३०० कोटी रुपये अशी वाढ झाली आहे.
बॅँकांनो, महागड्या कार घेऊ नका
आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागड्या कार खरेदी करू नका, असा इशारा वित्त मंत्रालयाने सरकारी बँकांना दिला आहे. विशेष म्हणजे यातील काही मोटारी कमी किमतीत कर्मचाऱ्यांना विकल्या
By admin | Updated: March 17, 2016 01:33 IST2016-03-17T01:33:51+5:302016-03-17T01:33:51+5:30
आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागड्या कार खरेदी करू नका, असा इशारा वित्त मंत्रालयाने सरकारी बँकांना दिला आहे. विशेष म्हणजे यातील काही मोटारी कमी किमतीत कर्मचाऱ्यांना विकल्या
