अरुंधती भट्टाचार्य : सर्व बाजूंचा विचार करून निर्णय घेऊ
मुंबई : रिझर्व्ह बँकेने बुधवारी रेपो दरात कपात जाहीर करताच स्टेट बँक आॅफ इंडियाने या निर्णयाचे स्वागत करून आम्ही आमच्या व्याजदरांबाबतही योग्य ते निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.
स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य निवेदनात म्हणाल्या की, आम्ही रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचे स्वागत करतो आणि सगळ्या बाजूंनी विचार करून आधार दराबाबत योग्य तो निर्णय घेऊ. सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यात चलनवाढीला आधार बनविल्यामुळे चलनवाढ कमी असेल, असे त्यात म्हटले. यामुळे बँकांना निर्णय घ्यायला मदत मिळेल. बँक आॅफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता म्हणाले की, व्याजदरातील कपातीमुळे रिझर्व्ह बँक वृद्धीबद्दल सकारात्मक आहे.
कमी झालेली चलनवाढ आणि बळकट राजकोष यामुळे उत्साही बनलेल्या रिझर्व्ह बँकेने बुधवारी रेपो दर ०.२५ टक्क्यांनी कमी करून ७.५ टक्के केला.
गेल्या दोन महिन्यांत रिझर्व्ह बँकेने आश्चर्यचकित करणारी ही दुसरी कपात केली आहे. या आधीच्या व्याजदरातील कपातीचा लाभ बँकांनी ग्राहकांना दिला नाही अशी तक्रार होती.

व्याजदर कपातीबाबत बँका सकारात्मक
रिझर्व्ह बँकेने बुधवारी रेपो दरात कपात जाहीर करताच स्टेट बँक आॅफ इंडियाने या निर्णयाचे स्वागत करून आम्ही आमच्या व्याजदरांबाबतही योग्य ते निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.
By admin | Updated: March 5, 2015 00:09 IST2015-03-05T00:09:43+5:302015-03-05T00:09:43+5:30