Lokmat Money > बिझनेस न्यूज > पीक विमा देण्यास बँकांकडून टाळाटाळ

पीक विमा देण्यास बँकांकडून टाळाटाळ

राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत २०१४मधील खरीप पिकाच्या नुकसानापोटी पीक विमा काढणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना विम्याचा दावा मंजूर झाला आहे. या दाव्यापोटीची रक्कम संबंधित

By admin | Updated: July 17, 2015 23:41 IST2015-07-17T23:41:16+5:302015-07-17T23:41:16+5:30

राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत २०१४मधील खरीप पिकाच्या नुकसानापोटी पीक विमा काढणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना विम्याचा दावा मंजूर झाला आहे. या दाव्यापोटीची रक्कम संबंधित

Banking to cover crop insurance | पीक विमा देण्यास बँकांकडून टाळाटाळ

पीक विमा देण्यास बँकांकडून टाळाटाळ

- गिरीश राऊत,  खामगाव (बुलडाणा)
राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत २०१४मधील खरीप पिकाच्या नुकसानापोटी पीक विमा काढणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना विम्याचा दावा मंजूर झाला आहे. या दाव्यापोटीची रक्कम संबंधित बँकांकडे १७ जून रोजीच वळती करण्यात आली असली तरी, ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यास अनेक बँकांकडून विलंब होत आहे. यापार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या कृषी विभागाने यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना १३ जुलै रोजी सांगितले.
२०१४च्या खरीप हंगामात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या दाव्यापोटी एकूण १५९५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, त्यापैकी १३५५ कोटी रुपयांची रक्कम विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी त्यांचे खाते असलेल्या बँकांकडे १७ जून रोजी वळती करण्यात आली. ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये
१५ दिवसांत वळती करण्याचे आदेश शासनाने दिले होते; मात्र अनेक बँकांकडून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वळती करण्यास विलंब केला जात आहे.

Web Title: Banking to cover crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.