नवी दिल्ली : स्टेट सेक्टर बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या (एसएसबीईए) विविध मागण्यांच्या समर्थनार्थ २४ जूनच्या संपाचे आपले आवाहन आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने (एआयबीईए) सोमवारी मागे घेतले. त्यामुळे सरकारी बँकांतील व्यवहार २४ जून रोजी नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
एसएसबीईएच्या अंतर्गत भारतीय स्टेट बँकेच्या सहयोगी बँका स्टेट बँक आॅफ बिकानेर अॅण्ड जयपूर, स्टेट बँक आॅफ त्रावणकोर, स्टेट बँक आॅफ पतियाळा, स्टेट बँक आॅफ म्हैसूर आणि स्टेट बँक आॅफ हैदराबादमधील कर्मचारी संघटना येतात व संघटना एआयबीईएशीही संलग्न आहेत. एसबीआय व्यवस्थापनाने सहयोगी बँकांबाबत प्रतिकूल दृष्टिकोन अवलंबल्याच्या निषेधार्थ देशव्यापी संपाचे आवाहन करण्यात आले होते.
संघटनेने सरकारकडे जाण्याचा निर्णय घेत प्रस्तावित संप मागे घेतला. (वृत्तसंस्था)
बँक कर्मचाऱ्यांचा २४ चा संप टळला
स्टेट सेक्टर बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या (एसएसबीईए) विविध मागण्यांच्या समर्थनार्थ २४ जूनच्या संपाचे आपले आवाहन आॅल इंडिया
By admin | Updated: June 22, 2015 23:39 IST2015-06-22T23:39:16+5:302015-06-22T23:39:16+5:30
स्टेट सेक्टर बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या (एसएसबीईए) विविध मागण्यांच्या समर्थनार्थ २४ जूनच्या संपाचे आपले आवाहन आॅल इंडिया
