यावल (जि. जळगाव) : ब-हाणपूर येथे केळी भावाने नवा उच्चांक गाठला. तेथे उच्च प्रतीच्या केळीचे भाव २१०२ रुपये क्विंटल वाढले होते. आतापर्यंतच्या भावातील हा २०१४ चा नवीन उच्चांक मानला जात आहे. त्याउलट रावेरसह जिल्ह्णात पुन्हा भावात घसरणीचे सत्र सुरू आहे.
एकीकडे बऱ्हाणपूरला भावाचा उच्चांक गाठला जात आहे तर दुसरीकडे जिल्ह्णात भाावात घसरण होत असल्याने आश्चर्य व्यक्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बऱ्हाणपूर येथे ५ नोव्हेंबर रोजी एकूण १०१ केळी ट्रकची आवक झाली. त्यात उच्च प्रतीच्या केळीला २१०२ रुपये क्विंटल असे विक्रमी भाव मिळाले. शिवाय इतर केळीला बऱ्हाणपूर येथे ९०० रुपयांपासून एक हजार ५०० ते एक हजार ६०० रुपयापर्यंत भाव मिळाले. मागणीनुसार बऱ्हाणपूर येथे भावात तेजी कायम आहे.
त्यामानाने रावेरसह जिल्ह्यात भावात घसरण सुरूच आहे. रावेर येथे कांदेबागाचे भाव काढण्यास सुरूवात झाली. सुरूवातीलाच रावेर येथे कांदेबागाचे भाव एक हजार १०० रुपये फरक ३५ असे काढण्यात आले. मात्र त्यानंतर कांदेबागाच्या भावात वाढ ऐवजी पुन्हा घसरण होऊन रावेर येथे कांदेबागाचे भाव ९५० रुपये फरक ३५ असे घसरले. पाच-सहा दिवसात १५० रुपये क्विंटलने घसरण झाली. (प्रतिनिधी)
केळीच्या भावाचा बऱ्हाणपूरला उच्चांक
ब-हाणपूर येथे केळी भावाने नवा उच्चांक गाठला. तेथे उच्च प्रतीच्या केळीचे भाव २१०२ रुपये क्विंटल वाढले होते
By admin | Updated: November 7, 2014 04:42 IST2014-11-07T04:42:28+5:302014-11-07T04:42:28+5:30
ब-हाणपूर येथे केळी भावाने नवा उच्चांक गाठला. तेथे उच्च प्रतीच्या केळीचे भाव २१०२ रुपये क्विंटल वाढले होते
