Lokmat Money > बिझनेस न्यूज > राज्यात कृत्रिमरीत्या फळे पिकविण्यास बंदी कायम

राज्यात कृत्रिमरीत्या फळे पिकविण्यास बंदी कायम

काही ठिकाणी कृत्रिमरीत्या फळे पिकवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा घातक प्रकार चालू आहे. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कृत्रिमरीत्या भाज्या

By admin | Updated: December 24, 2015 00:17 IST2015-12-24T00:17:49+5:302015-12-24T00:17:49+5:30

काही ठिकाणी कृत्रिमरीत्या फळे पिकवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा घातक प्रकार चालू आहे. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कृत्रिमरीत्या भाज्या

To ban the production of artificial fruits in the state | राज्यात कृत्रिमरीत्या फळे पिकविण्यास बंदी कायम

राज्यात कृत्रिमरीत्या फळे पिकविण्यास बंदी कायम

नागपूर : काही ठिकाणी कृत्रिमरीत्या फळे पिकवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा घातक प्रकार चालू आहे. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कृत्रिमरीत्या भाज्या व फळे पिकविण्यास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियमातील तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल, असे अन्न व औषधी प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत सांगितले.
अमीन पटेल यांनी लक्षवेधी सूचनेदरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बापट बोलत होते. त्यांनी सांगितले की, अन्नपदार्थांची मानके, अन्नपदार्थावरील प्रतिबंध आणि निर्बंध इत्यादी नियमांचा अन्नसुरक्षा व मानके अधिनियम २००६ मध्ये समावेश आहे.या अधिनियमामध्ये गुन्ह्याच्या गंभीरतेनुसार शिक्षेची तरतूद, ग्राहकाचे हित जपून नियमबाह्य पदार्थ बाजारातून माघारी बोलाविणे इत्यादी बाबींचा समावेश आहे.
विविध रसायनांचा वापर करून फळे व भाजीपाला पिकविला जातो. याला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती करणे, वेळोवेळी फळे व भाज्या विक्रेत्यांची तपासणी करणे, तसेच कृत्रिमरीत्या फळे न पिकविण्याबाबत कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे, असेही बापट यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: To ban the production of artificial fruits in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.