Lokmat Money > बिझनेस न्यूज > बजाज पल्सरची दोन मॉडेल्स बाजारात

बजाज पल्सरची दोन मॉडेल्स बाजारात

वाहननिर्मित अग्रेसर असलेल्या बजाज आॅटो कंपनीने त्यांच्या लोकप्रिय पल्सरची दोन मॉडेल्स सादर केली आहेत. स्पोर्टस् श्रेणीतील ही दोन

By admin | Updated: June 13, 2015 00:13 IST2015-06-13T00:13:18+5:302015-06-13T00:13:18+5:30

वाहननिर्मित अग्रेसर असलेल्या बजाज आॅटो कंपनीने त्यांच्या लोकप्रिय पल्सरची दोन मॉडेल्स सादर केली आहेत. स्पोर्टस् श्रेणीतील ही दोन

Bajaj Pulsar's two models in the market | बजाज पल्सरची दोन मॉडेल्स बाजारात

बजाज पल्सरची दोन मॉडेल्स बाजारात

मुंबई : वाहननिर्मित अग्रेसर असलेल्या बजाज आॅटो कंपनीने त्यांच्या लोकप्रिय पल्सरची दोन मॉडेल्स सादर केली आहेत. स्पोर्टस् श्रेणीतील ही दोन मॉडेल्स असून ए.एस.२०० आणि ए.एस.१५० अशी त्यांची नावे आहेत.
तरुणाईत असलेली साहसी खेळाची आवड लक्षात घेऊन या दोन मॉडेल्सची निर्मिती करण्यात आली आहेत. तरुणाईची आवड आणि स्टाईल स्टेटमेंट या दोन घटकांना लक्षात घेत त्यांच्या डिझाईनकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. अ‍ॅडव्हेन्चर स्पोर्टस श्रेणीतील या दोन बाईक्स असल्याने या बाईक्सची निर्मिती करताना ब्रेक आणि सस्पेन्शन यासह सुरक्षेच्या अनुषंगाने विविध अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापरावर विशेष लक्ष दिले आहे. गाडीचे लूक्स आणि रंग याकडेही विशेष लक्ष देण्यात आले आहे. यापैकी ए.एस.२०० या गाडीची दिल्लीतील एक्स शोरुम किंमत ९२,५०० रुपये आहे तर ए.एस.१५० या गाडीची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत ७९,००० रुपये आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bajaj Pulsar's two models in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.