Lokmat Money > बिझनेस न्यूज > हॉवित्झर तोफांसाठी बीएई-महिंद्रा भागीदारी

हॉवित्झर तोफांसाठी बीएई-महिंद्रा भागीदारी

१४५ एम ७७७ हॉवित्झर तोफांच्या पुरवठ्यासाठी बीएई सिस्टिम्सने महिंद्राशी भागीदारी केली आहे. या तोफा वजनाने हलक्या असून, त्याची मारक क्षमता २५ किलोमीटरपर्यंत आहे

By admin | Updated: February 18, 2016 06:44 IST2016-02-18T06:44:27+5:302016-02-18T06:44:27+5:30

१४५ एम ७७७ हॉवित्झर तोफांच्या पुरवठ्यासाठी बीएई सिस्टिम्सने महिंद्राशी भागीदारी केली आहे. या तोफा वजनाने हलक्या असून, त्याची मारक क्षमता २५ किलोमीटरपर्यंत आहे

BAE-Mahindra Partnership for Howitzer Mustangs | हॉवित्झर तोफांसाठी बीएई-महिंद्रा भागीदारी

हॉवित्झर तोफांसाठी बीएई-महिंद्रा भागीदारी

नवी दिल्ली : १४५ एम ७७७ हॉवित्झर तोफांच्या पुरवठ्यासाठी बीएई सिस्टिम्सने महिंद्राशी भागीदारी केली आहे. या तोफा वजनाने हलक्या असून, त्याची मारक क्षमता २५ किलोमीटरपर्यंत आहे. सुमारे ७० कोटी डॉलरचा हा सौदा आहे.
तोफांचा हा सौदा विदेशी सैन्य विक्री (एफएमएस)द्वारे होणार आहे; पण सुटे भाग, दुरुस्ती आणि दारूगोळा यांचे परिचालन भारतीय प्रणालीद्वारे होईल, असे संरक्षण सूत्रांनी सांगितले.
बीएईने एका निवेदनाद्वारे म्हटले आहे की, बीएई सिस्टिमने देशात एम ७७७ अल्ट्रा लाईटवेट हॅवित्झरसाठी प्रस्तावित असेंब्ली, एकीकरण आणि परीक्षण सुविधेसाठी (एआयटी) महिंद्राला आपला भागीदार म्हणून निवडले आहे. भारत आणि अमेरिका भारतीय लष्करासाठी १४५ एमएम ७७७ ए २ एलडब्ल्यू १५५ हॅवित्झर तोफांचा पुरवठा करण्याबाबत विचार करीत आहेत.
बीएई सिस्टिम्स येत्या काही आठवड्यांत महिंद्रासोबत काम करण्याचा विचार करीत आहे. या सौद्यातील व्यवस्थेला अंतिम स्वरूप देण्याचा प्रस्ताव आहे.
बीएईने गेल्या वर्षी अमेरिकी सरकार समर्थित एक प्रस्ताव सादर केला होता. त्यात एम ७७७ एम प्रणालीचे जास्तीत जास्त स्वदेशीकरण करण्याची पेशकश करण्यात आली होती. भारतात एआयटी क्षमता स्थापित करण्यामागे भारतीय कंपन्यांसोबत भागीदारी हा मुख्य केंद्रबिंदू आहे.
कंपनीने म्हटले आहे की, गरज पूर्ण करणे आणि एम ७७७ इंडिया कार्यक्रमाचे योग्य मूल्य प्रदान करण्यासाठी महिंद्राची क्षमता आणि भविष्यात भारतात बीएई सिस्टीम्ससाठी रणनीतिक भागीदार म्हणून त्याची क्षमता वाढविण्याच्या शक्यतेचा सखोल विचार करूनच महिंद्राची निवड करण्यात आली
आहे.
बीएई सिस्टिम्सचे उपाध्यक्ष आणि महाप्रबंधक (अस्मा प्रणाली) जो सेन्फरल यांनी सांगितले की, भारतात संरक्षण उत्पादनातील संस्थापक भागीदार म्हणून महिंद्राची निवड करून आम्ही खुश आहोत. ही सुविधा एम ७७७ उत्पादनाच्या सुविधेचे पायाभूत अंग आहे.

Web Title: BAE-Mahindra Partnership for Howitzer Mustangs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.