मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी १७ अंकांनी कोसळून बंद झाला. सकल वार्षिक उत्पाद (जीडीपी) तथा रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर बँकिंग शेअर्स कोसळले. जानेवारीनंतर पहिल्यांदाच बाजारासाठी हा सर्वात वाईट आठवडा ठरला. सकारात्मक संकेताच्या अभावामुळे परकीय गुंतवणूकदारांकडून बाजारात विक्रीचा दबाव वाढला आहे. संमिश्र सत्रादरम्यान ३० कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स मागील बंद झालेल्या पातळीवरच उघडला. सुरुवातीला बाजार २४,३५३ पर्यंत वरती चढला होता; परंतु ही वाढ कायम टिकू शकली नाही. अखेरीस बाजार १६.८१ अंकांनी घसरून २४,२१७.३४ अंकावर बंद झाला. आठवडाभरात सेन्सेक्स ४७६.०९ अंकांनी खाली आला. ३१ जानेवारी २०१४ रोजी समाप्त झालेल्या सप्ताहानंतर बाजारातील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण आहे. त्या आठवड्यात बाजार ६१९ अंकांनी कोसळला होता. ५० कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असलेला निफ्टी ५.७० अंकांनी किंवा ०.०८ टक्क्याच्या घसरणीसह ७,२२९.९५ अंकावर बंद झाला. (प्रतिनिधी)
वाईट आठवडा!
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी १७ अंकांनी कोसळून बंद झाला. सकल वार्षिक उत्पाद (जीडीपी) तथा रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर बँकिंग शेअर्स कोसळले.
By admin | Updated: May 31, 2014 06:27 IST2014-05-31T06:27:06+5:302014-05-31T06:27:06+5:30
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी १७ अंकांनी कोसळून बंद झाला. सकल वार्षिक उत्पाद (जीडीपी) तथा रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर बँकिंग शेअर्स कोसळले.
