Lokmat Money > बिझनेस न्यूज > आॅगस्टमध्ये वाहन उद्योगाचा टॉप गीअर

आॅगस्टमध्ये वाहन उद्योगाचा टॉप गीअर

देशात दोन, तीन आणि चारचाकी तसेच व्यावसायिक वाहन उत्पादक कंपन्यांच्या विक्रीत आॅगस्ट महिन्यात काही मोजक्या कंपन्यांचा अपवाद वगळता चांगली वाढ झाली

By admin | Updated: September 2, 2015 00:09 IST2015-09-01T22:48:51+5:302015-09-02T00:09:18+5:30

देशात दोन, तीन आणि चारचाकी तसेच व्यावसायिक वाहन उत्पादक कंपन्यांच्या विक्रीत आॅगस्ट महिन्यात काही मोजक्या कंपन्यांचा अपवाद वगळता चांगली वाढ झाली

Automotive industry top gear in August | आॅगस्टमध्ये वाहन उद्योगाचा टॉप गीअर

आॅगस्टमध्ये वाहन उद्योगाचा टॉप गीअर

नवी दिल्ली : देशात दोन, तीन आणि चारचाकी तसेच व्यावसायिक वाहन उत्पादक कंपन्यांच्या विक्रीत आॅगस्ट महिन्यात काही मोजक्या कंपन्यांचा अपवाद वगळता चांगली वाढ झाली. वाहन कंपन्यांनी ही माहिती मंगळवारी निवेदनाद्वारे दिली. उत्तम बाजारपेठ कौशल्ये आणि ग्राहक केंद्रित धोरणांमुळे हे यश मिळाले.
देशातील सगळ्यात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीची एकूण विक्री आॅगस्ट २०१५ मध्ये ६.४ टक्क्यांनी वाढून १,१७,८६४ कार्सची झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात ती १,१०,७७६ होती.
देशांतर्गत बाजारात कंपनीची विक्री ८.६ टक्के वाढून १,०६,७८१ कार्सची विक्री झाली.

अशोक लेलँड
हिंदुजा समूहाच्या अशोक लेलँडच्या विक्रीत ३८.५३ टक्के वाढ होऊन कंपनीने ११,५४४ वाहने विकली. गेल्या वर्षी ८,३३३ वाहने विकली गेली होती.

महिंद्रा अँड महिंद्रा
महिंद्रा अँड महिंद्राच्या व्यवसायात १.२९ टक्क्यांची वाढ होऊन ३५,६३४ वाहने विकली गेली. २०१४ मध्ये कंपनीने ३५,१८० वाहने विकली होती. महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या विक्रीमध्ये २२.०३ टक्क्यांची घट होऊन ११,६९९ वाहने विकली गेली. ही विक्री गेल्या वर्षी १५,००६ एवढी होती.

ह्युंदाई मोटार
ह्युंदाई मोटारच्या व्यवसायात १३.५० टक्क्यांची वाढ होऊन ५४,६०८ वाहने विकली गेली. गेल्यावर्षी कंपनीने आॅगस्टमध्ये ४८,१११ कार विकल्या होत्या. कंपनीची निर्यात १.७९ टक्क्यांनी खाली येऊन १४,१०३ कार्स विकल्या गेल्या.

व्हीई कमर्शियल
व्यावसायिक वापराची वाहन उत्पादक कंपनी व्हीई कमर्शियलच्या विक्रीमध्ये २०.२१ टक्क्यांची वाढ होऊन ३,७११ वाहने विकली.

टोयोटा किर्लोस्कर
टोयोटा किर्लोस्कर मोटारच्या विक्रीत १.२९ टक्के वाढ होऊन ती १२,५४७ झाली.
यामाहा मोटार
यामाहा मोटार इंडियाच्या विक्रीमध्ये १५ टक्क्यांची वाढ होऊन ६१,४४० वाहने विकली गेली.

Web Title: Automotive industry top gear in August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.