नवी दिल्ली : सरकारने ६९ छोट्या आणि सीमांत तेल आणि गॅस क्षेत्रांच्या लिलावाची योजना आखली आहे. यापैकी एक तृतीयांश क्षेत्रे मुंबई अपतटीय क्षेत्रात आहेत. येथून १.५ कोटी टन तेल भांडार उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, सरकारी कंपन्या ओएनजीसी आणि आॅईल इंडिया यांच्या अखत्यारीतील निष्क्रिय असलेल्या तेल आणि गॅस क्षेत्रापैकी २७ क्षेत्रे मुंबई अपतटीय क्षेत्रात आहेत. उरलेली १५ क्षेत्रे कृष्णा-गोदावरी खोऱ्यात (केजी बेसीन) येतात. याशिवाय आणखी १0 क्षेत्रे आसाममध्ये शोधण्यात आली आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, या तेल क्षेत्रांना वरील दोन्ही सरकारी कंपन्यांनी सोडून दिले आहे. विविध कारणांमुळे या क्षेत्रांचा विकास करणे कंपन्यांना शक्य झालेले नाही. सर्व सात तेल क्षेत्रे पाच वर्षे जुनी आहेत. यातील सर्वाधिक नवे क्षेत्र केजी बेसीनमध्ये कोरावाका गॅस फिल्ड हे आहे.
मुंबईजवळ १३ तेल क्षेत्रांचा होणार लिलाव
सरकारने ६९ छोट्या आणि सीमांत तेल आणि गॅस क्षेत्रांच्या लिलावाची योजना आखली आहे. यापैकी एक तृतीयांश क्षेत्रे मुंबई अपतटीय क्षेत्रात आहेत
By admin | Updated: September 14, 2015 00:52 IST2015-09-14T00:52:56+5:302015-09-14T00:52:56+5:30
सरकारने ६९ छोट्या आणि सीमांत तेल आणि गॅस क्षेत्रांच्या लिलावाची योजना आखली आहे. यापैकी एक तृतीयांश क्षेत्रे मुंबई अपतटीय क्षेत्रात आहेत
