Lokmat Money > बिझनेस न्यूज > एटीएम बातमीसाठी जोड

एटीएम बातमीसाठी जोड

बँक फोनवर एटीएम नंबर, पिन नंबर मागत नाही

By admin | Updated: June 20, 2014 21:25 IST2014-06-20T21:25:03+5:302014-06-20T21:25:03+5:30

बँक फोनवर एटीएम नंबर, पिन नंबर मागत नाही

Attachment for ATM news | एटीएम बातमीसाठी जोड

एटीएम बातमीसाठी जोड

क फोनवर एटीएम नंबर, पिन नंबर मागत नाही
स्टेट बँक ऑफ हैदराबादचे एटीएम चॅनल व्यवस्थापक प्रमोद भेंडे यांनी सांगितले की, कोणतीही बँक फोनवर किंवा एसएमएसद्वारे ग्राहकांना त्यांचा एटीएम कार्ड नंबर व पिन नंबर (पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर) मागत नाही. यामुळे कोणत्याही बँकेच्या नावाने आपणास कोणी फोन अथवा एसएमएस करून एटीएम कार्ड नंबर किंवा पिन नंबर मागत असेल तर त्यास तो देऊ नका. नागरिक अनोळखी माणसाला सर्रास आपला एटीएम नंबर व पिन नंबर सांगतात. चोर याचाच फायदा घेऊन त्यांच्या खात्यातील रक्कम लंपास करतात.
------------
एटीएम कार्डसंदर्भात सूचना
१) एटीएम कार्ड हरविले तर सर्वप्रथम कार्ड नंबर ब्लॉक करण्यासाठी बँकेला कळवा. लेखी स्वरूपात अर्ज करा.
२) एटीएम कार्डवरच टोल फ्री नंबर दिलेला असतो त्यानंबरवर फोन करून कार्ड ब्लॉक करण्यास सांगावे.
३) जर तुम्ही हरवलेल्या एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती बँकेला कळविली नाही, तर त्या कार्डचा गैरवापर होऊ शकतो.
४) हरवलेले एटीएम कार्ड ब्लॉक झाल्याची खात्री झाल्यानंतरच दुसर्‍या एटीएम कार्डसाठी अर्ज करा.
५) फोनवर कोणालाही एटीएम कार्ड नंबर किंवा पिन नंबर सांगू नका.
६) स्वत:चे एटीएम कार्ड स्वत:च हातळा.
७) लहान मुलांच्या हातात एटीएम कार्ड देऊ नका.
८) एटीएमवर एटीएम कार्ड नंबर व पिन नंबर टाकताना कोणी त्यावर लक्ष ठेवत नाही ना, याची खात्री करा.
९) कोणी एटीएममध्ये कार्ड गुंतले किंवा पैसे काढण्यासाठी मदत करीत असेल, तर मदत नाकारा.
१०) कार्ड गुंतले किंवा पैसे अडकल्यास बँक अधिकार्‍याचीच मदत घ्या.
११) व्यवहार पूर्ण झाल्याची सूचना मिळाल्यावरच एटीएममधून बाहेर पडा.
१२) पिन नंबर विसरल्यास बँकेला लेखी स्वरूपात अर्ज करून नवीन पिन नंबर प्राप्त करून घेता येतो.
------------
चौकट
२५ टक्के तक्रारी एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डच्याच
रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार २०१२-२०१३ मध्ये बँकिंग लोकपालकडे बँकिंग व्यवहारासंदर्भात ७० हजार तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील २५ टक्के तक्रारी या एटीएम, डेबिट व क्रेडिट कार्डसंदर्भात होत्या.

Web Title: Attachment for ATM news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.