Lokmat Money > बिझनेस न्यूज > विधानसभेसाठी पथके गठित निवडणूक तयारी :

विधानसभेसाठी पथके गठित निवडणूक तयारी :

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर तयारी गतिमान झाली असून, लोकसभा निवडणुकीच्या काळात झालेली धावपळ टाळण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाने आत्तापासूनच विविध पथके गठित करून त्यांना जबाबदारीचे वाटप सुरू केले आहे. पुढच्या आठवड्यात या पथकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचेही आयोजन करण्यात येणार असून, पथकांनी त्यांचा दैनंदिन कार्यअहवाल अगोदर निवडणूक अधिकार्‍यांकडे व त्यानंतर पोलिसांकडे सुपूर्द करण्याच्या स्पष्ट सूचना आगाऊ देण्यात आल्या आहेत.

By admin | Updated: August 22, 2014 22:11 IST2014-08-22T22:11:23+5:302014-08-22T22:11:23+5:30

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर तयारी गतिमान झाली असून, लोकसभा निवडणुकीच्या काळात झालेली धावपळ टाळण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाने आत्तापासूनच विविध पथके गठित करून त्यांना जबाबदारीचे वाटप सुरू केले आहे. पुढच्या आठवड्यात या पथकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचेही आयोजन करण्यात येणार असून, पथकांनी त्यांचा दैनंदिन कार्यअहवाल अगोदर निवडणूक अधिकार्‍यांकडे व त्यानंतर पोलिसांकडे सुपूर्द करण्याच्या स्पष्ट सूचना आगाऊ देण्यात आल्या आहेत.

Assembly elections: Preparation of Assembly elections | विधानसभेसाठी पथके गठित निवडणूक तयारी :

विधानसभेसाठी पथके गठित निवडणूक तयारी :

शिक : विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर तयारी गतिमान झाली असून, लोकसभा निवडणुकीच्या काळात झालेली धावपळ टाळण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाने आत्तापासूनच विविध पथके गठित करून त्यांना जबाबदारीचे वाटप सुरू केले आहे. पुढच्या आठवड्यात या पथकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचेही आयोजन करण्यात येणार असून, पथकांनी त्यांचा दैनंदिन कार्यअहवाल अगोदर निवडणूक अधिकार्‍यांकडे व त्यानंतर पोलिसांकडे सुपूर्द करण्याच्या स्पष्ट सूचना आगाऊ देण्यात आल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची घोषणा झाल्यानंतर आयोगाने वेगवेगळी पथके गठित करण्याचे आदेश दिल्यामुळे निवडणूक यंत्रणेची धावपळ उडाली होती. त्यातच या पथकांना सोपविलेली जबाबदारी व त्यांच्यावरील नियंत्रण याबाबतही संदिग्धता असल्याने कार्यपूर्तीचा अहवाल कोणाला सादर करावयाचा याबाबतही निवडणूक शाखा व पोलीस यंत्रणा यांच्यात वाद असल्याचे उघड झाले होते. हे सारे प्रकार टाळण्यासाठी आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वीच सर्व तयारी करण्यात येत आहे. त्यात व्हिडीओ व्हिजिलीन्स पथक, सांख्यिकी पथक, आचारसंहिता अंमलबजावणी पथक, मतदार जागृती पथक, खर्च तपासणी पथक अशा पथकांचा समावेश आहे. निवडणुकीची घोषणा होताच या पथकांचे काम सुरू होणार असल्यामुळे तत्पूर्वीच ही पथके गठित करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने जिल्हा निवडणूक शाखेने लोकसभा निवडणुकीत ज्यांनी या पथकांमध्ये कामे केली, अशा अधिकारी व कर्मचार्‍यांना पत्र पाठवून त्यांना त्यांच्या नेमणुकीबाबत अवगत करण्यात आले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी तीन पथके कायमस्वरूपी राहणार असून, त्या-त्या पथकांनी आपल्या कार्यपूर्तीचा अहवाल अगोदर मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकार्‍याला सादर करावयाचा आहे. त्यानंतर जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत तो पोलीस यंत्रणेस सादर केला जाईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Assembly elections: Preparation of Assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.