आर्य चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम
By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:32+5:302015-01-22T00:07:32+5:30

आर्य चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम
>वाणिज्य बातमी ... १० बाय ३ ...फोटो आहे... रॅपमध्ये ...कॅप्शन : आर्य चॅरिटेबल ट्रस्टच्या विशेष उपक्रमाची माहिती देताना विशाल बरबटे, बाजूला डॉ. सतीश देवपुजारी, सतीश बरबटे, नीलेश बरबटे व अमित बाजपेयी.- जन्मजात मुलांची नि:शुल्क थायरॉईड चाचणी : मनपाचे सहकार्यनागपूर : लहान मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी पाच वर्षांपासून कार्यरत असलेल्या आर्य चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मनपा अंतर्गत असलेल्या रुग्णालयात जन्मलेल्या मुलांची थायरॉईड चाचणी नि:शुल्क करण्यात येणार आहे. यासाठी वैद्यकीय अधीक्षक, इंदिरा गांधी रुग्णालय आणि मनपाचे सहकार्य लाभले आहे.या उपकमाची माहिती देताना ट्रस्टचे अध्यक्ष विशाल बरबटे आणि मुख्य सल्लागार डॉ. सतीश देवपुजारी यांनी संयुक्त पत्रपरिषदेत सांगितले की, या चाचणीद्वारे जन्मजात मुलांमध्ये असलेल्या व्याधी तातडीने कळून त्यावर योग्य तो उपचार करणे शक्य होते. यामुळे मुलं निरोगी राहण्यास निश्चितच मदत होणार आहे.ट्रस्टची स्थापना २०१० मध्ये मास्टर आर्य बरबटे याच्या स्मृतिप्रीत्यर्थ विशाल बरबटे यांनी नामांकित बालरोगतज्ज्ञ डॉ. सतीश देवपुजारी यांच्या मदतीनेेकेली. लहान मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी ट्रस्ट विदर्भातील गावागावांमध्ये पथनाट्याद्वारे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करते. याशिवाय मुलांमध्ये जन्मत: असलेले आजार आणि त्यावर उपचाराची विस्तृत माहिती देण्यात येते. या उपक्रमासाठी देशातील नामांकित डॉक्टरांची मदत घेतली जाते. हे डॉक्टर्स नागपुरात येऊन रुग्णांना मार्गदर्शन करतात आणि प्रतिबंधक उपायांची माहिती देतात. ट्रस्टने राबविलेल्या उपक्रमांचा अनेकांना फायदा झाला आहे. ट्रस्टच्या वेबसाईटवर माहिती उपलब्ध आहे. पत्रपरिषदेत ट्रस्टचे सतीश बरबटे, नीलेश बरबटे, डॉ. अनिल जिव्हाणे आणि अमित बाजपेयी उपस्थित होते.