टोकियो : तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांतर्फे कर्मचाऱ्यांच्या पगाराचे नवनवे आकडे देणाऱ्या बातम्या प्रसिद्ध होत असतानाच, या सर्वांवर कडी करू शकेल अशी एक बातमी आहे. जन्माने भारतीय असलेल्या निकेश अरोरा यांनी नुकताच जपानस्थित सॉफ्टबँक कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली असून त्यांचा पगार दिवसाला तब्बल चार कोटी रुपये इतका असल्याचे वृत्त आहे.
‘गुगल’कंपनीच्या यशाचे साक्षीदार आणि सहयोगी असलेल्या निकेश अरोरा यांची जपान येथील दूरसंचार क्षेत्रातील अग्रगण्य अशा सॉफ्टबँक कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली असून, त्यांचा सप्टेंबर २०१४ ते मार्च २०१५ या कालावधी महिन्याकाठी १२० कोटी रुपयांचे वेतन अदा करण्यात येणार आहे. याखेरीज कंपनीने त्यांना १४० कोटी रुपयांचा विशेष नियुक्ती बोनस दिला आहे.
अरोरा यापूर्वी गुगल इंडियाचे प्रमुख व्यवसाय अधिकारी म्हणून कार्यरत होते व त्यावेळी देखील कंपनीतील सर्वाधिक वेतन घेणारे अधिकारी असा त्यांचा लौकिक होता. त्यावेळी त्यांचे वेतन महिन्याला ५७ कोटी रुपये इतके होते. (वृत्तसंस्था)
निकेत अरोरा यांना दिवसाला ४ कोटी पगार
तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांतर्फे कर्मचाऱ्यांच्या पगाराचे नवनवे आकडे देणाऱ्या बातम्या प्रसिद्ध होत असतानाच, या सर्वांवर कडी करू शकेल अशी
By admin | Updated: July 24, 2015 00:00 IST2015-07-24T00:00:07+5:302015-07-24T00:00:07+5:30
तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांतर्फे कर्मचाऱ्यांच्या पगाराचे नवनवे आकडे देणाऱ्या बातम्या प्रसिद्ध होत असतानाच, या सर्वांवर कडी करू शकेल अशी
