Lokmat Money > बिझनेस न्यूज > अ‍ॅपलचे नवे स्मार्ट डिव्हाइस लाँच

अ‍ॅपलचे नवे स्मार्ट डिव्हाइस लाँच

अ‍ॅपलने सन फ्रांसिस्कोमध्ये आयोजित एका खास समारोहात आयफोन ६ एस (iPhone 6S) व आयफोन 6एस प्लस (iPhone 6S +) सादर केले. यासोबतच अ‍ॅपलने आयपॅड प्रो

By admin | Updated: September 11, 2015 02:41 IST2015-09-11T02:41:00+5:302015-09-11T02:41:00+5:30

अ‍ॅपलने सन फ्रांसिस्कोमध्ये आयोजित एका खास समारोहात आयफोन ६ एस (iPhone 6S) व आयफोन 6एस प्लस (iPhone 6S +) सादर केले. यासोबतच अ‍ॅपलने आयपॅड प्रो

Apple's new smart device launch | अ‍ॅपलचे नवे स्मार्ट डिव्हाइस लाँच

अ‍ॅपलचे नवे स्मार्ट डिव्हाइस लाँच

अ‍ॅपलने सन फ्रांसिस्कोमध्ये आयोजित एका खास समारोहात आयफोन ६ एस (iPhone 6S) व आयफोन 6एस प्लस (iPhone 6S +) सादर केले. यासोबतच अ‍ॅपलने आयपॅड प्रो याचेदेखील लाँचिंग केले आहे. ‘ओरिजनल आयपॅड’नंतर आयपॅडशी संबंधित असलेली ही सर्वांत मोठी बातमी असल्याचे सांगितले आहे. नवा आयफोन कसा असेल या प्रश्नाचे उत्तर अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी नवा आयफोन सादर करताना दिले. ते म्हणाले, हे आजपर्यंतचे सर्वांत अ‍ॅडव्हॉन्स फोन आहेत.

किती असेल किंमत
नव्या आयफ ोनची प्री-आॅर्डर बुकिंग या शनिवारपासून (१२ सप्टेंबर) सुरू होणार आहे. कंपनी नव्या उत्पादनाला १२ देशात २५ सप्टेंबरपासून विक्रीसाठी पाठविणे सुरू करणार आहे. ‘आयफोन 6एस’ व ‘आयफोन 6एस प्लस’ या दोन्ही डिव्हाईसची किंमत मागील वर्षी लाँच केलेल्या मॉडेल एवढीच ठेवण्यात आली आहे. आयफोन ६ एस चा ६४ जीबी व आयफोन ६ एस प्लसचा १६ जीबी व्हेरिअंटची किंमत ७४९ डॉलर (सुमारे ४९६५० रू.) असेल. ८४९ डॉलर खर्च करून आयफोन ६एसचे १२८ जीबीचे मॉडेल व आयफोन ६एस प्लस चे ६४ जीबीचे मॉडेल विकत घेता येईल. आयफोन ६एस प्लस १२८ जीबीची किंमत ९४९ डॉलर एवढी आहे.

खासियत
आयफोन ६एस व आयफोन ६एस प्लस सिल्व्हर, गोल्ड, स्पेस ग्रे व रोज गोल्ड अ‍ॅल्मुनिअम फिनीश कलरमध्ये उपलब्ध असेल तर आयपॅड प्रो सिल्व्हर, ग्रे, स्पेस ग्रे या रंगात उपलब्ध राहतील. स्मार्टफ ोन 3डी टच टेक्नॉलॉजीसह असेल. यात प्रेशर सेंसेटिव्ह स्क्रिन असेल. जे बोटांच्या दबावाने क न्टेंट पोस्ट करू शकतील. यामुळे युजर्सला फोनमध्ये असलेले अ‍ॅप उघडण्याची गरज नाही.

कॅमेरा
आयफोन ६एस व आयफोन ६एस प्लसचा १२ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा असेल. यामुळे ४के रेज्युलेशनचे व्हिडीओ रेकॉर्ड केले जाऊ शकतात. यात बेस्ट कलर एक्युरेसी, फास्ट आटोफोकस, कमी प्रकाशात बेस्ट परफार्मन्स असल्याचा दावा केला आहे. तर फ्रंट कॅमेरा 5 मेगा पिक्सलचा असेल. यात एका खास टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. फ्र ंट कॅमेरा वापरताना डिस्प्ले फ्लॅशचे काम क रेल.

चिपसेट
आयफोन ६एस व आयफोन ६एस प्लसमध्ये नवे ‘लाईव्ह फोटोज’ हे फिचर समाविष्ठ असेल. यात युजर्स फोटो सोबतच आपला आवाजही कॅप्चर करू शकतील. यात २३ एलटीई बँड सपोर्ट असल्याने वायफाय व एलटीईला सहाय्य करणारे आहेत. यातील सेंसर दोनपट जास्त वेगवान असल्याने दुप्पट वेगाने काम करू शकतील. यात ए९ चिपसेट असेल. यामुळे यातील 'ऌी८ र्र१्र' हे फिचर नेहमी अ‍ॅक्टिव्ह राहील. व्हर्चुअल असिस्टंट फिचरच्या वापरासाठी कोणतिही बटन दाबण्याची गरज नाही.

अ‍ॅपल टीव्हीदेखील...
सन फ्रान्सिक ो येथील समारोहात शेवटच्या क्षणी सर्वांत महत्त्वाचे प्रोडक्ट लॉच क रण्यात आहे ते म्हणजे अ‍ॅपल टीव्ही. एखाद्या सेट टॉप बॉक्स सारखा दिसणारा हे डिव्हाईस बेस्ट म्हणावे असेच आहे. ए८ प्रोसेसर असलेल्या अ‍ॅपल टीव्हीला इंटीग्रेटेड सिरी सपोर्ट देण्यात आला आहे. यात कंटेन सर्च, रिमोट कंट्रोल, अ‍ॅप स्टोर, टचपॅड व इंटर्नल स्टोरेज आहे. यामाध्यमातून अनेक चॅनल्स सर्च करता येतात.

आयपॅड प्रो : नव्याने सादर करण्यात आलेल्या ‘आयपॅड प्रो’मध्ये १२.० इंच २७३२२०४८ पिक्सल रेज्यूलेशन डिस्प्ले आहे. आयपॅड प्रो नोव्हेंबर महिन्यापासून बाजारात उपलब्ध केला जाईल. आयपॅड प्रो ३२ जीबी (वाई फाय) मॉडेलची किंमत ७९९ डॉलर (सुमारे " ५२९७०)असेल. १२८ जीबीच्या मॉडेलची किंमत ९४९ डॉलर व वायफाय सोबत एलटीई सपोर्ट असलेला १२८ जीबीच्या व्हेरिअंटची किंमत १०७९ डॉलर असेल. भारतात हे सर्व मॉडेल्स केव्हा लाँच केला जाईल याची माहिती अद्याप अ‍ॅपलने दिली नाही.

चिपसेट : आयपॅड प्रोमध्ये ए9एक्स (अ9) चीपचा वापर करण्यात आला आहे. जुण्या आयपॅडमधील चीपसेटपेक्षा १.८ पट जास्त वेगवान आहे. अ‍ॅपल वर्ल्डवाईड मार्केटिंगचे सिनीअर वाईस प्रेसिडेंट फिल स्किलर म्हणाले, मागील सहा महिन्यात विक्री झालेल्या पर्सनल काम्प्युटरपेक्षा हे डिव्हाईस वेगवान आहे. यात ४के रेज्युलेशनचे ३ व्हिडीओ एका वेळी एडीट केले जाऊ शकतात. आयपॅड प्रो ६.० मिमी पातळ आहे. शिवाय याची बॅटरी लाईफ १० तासांची आहे. यात असेका मॅग्नेटिक कनेक्टर नवे कीबोर्ड कव्हर वापरासाठी उपयोगी पडतो. कीबोर्ड कव्हरमध्ये फिजीकल कीबोर्ड देखील आहे.

पेन्सिल व कीबोर्ड :
याच वेळी अ‍ॅपल पेन्सिल व अ‍ॅपल कीबोर्डसह अ‍ॅपल टीव्ही यांचे लॉचिंग करण्यात आले. आयपॅडसाठी असलेला मॅग्नेटिक कनेक्टर कीबोर्ड कव्हर वापरासाठी उपयोगी पडतो. यातील कीबोर्ड कव्हरमध्ये फिजीकल कीबोर्ड देखील आहे. अ‍ॅपल पेन्सिल ही आयपॅडला अधिक आकर्षक करणारी आहे.

NEW APPS
अ‍ॅप्स डाऊनलोड केल्यानंतर स्मार्टफोनच्या इंटर्नल मेमरीमधील खूप सारी जागा त्याला सपोर्ट करणाऱ्या फाईल्स, किंवा फोटो व्यापतात. या फाईल्समुळे बऱ्याचदा मोबाईल हँग होणे, अ‍ॅप्लिकेशन नीट न चालणे या अडचणी येतात. इंटर्नल मेमरीमधील अनावश्यक गोष्टी एसडी कार्डमध्ये टाकता येतात. यासाठी अस्रस्रटॅ१ ककक हे अ‍ॅप अत्यंत उपयोगी आहे. हे अ‍ॅप वापरण्यास सोपे असून यास अ‍ॅक्टिव्ह केल्यावर रिसिव्ह होणाऱ्या मोठ्या फ ाईल्स अ‍ॅटोमॅटिक मेमरी कार्डमध्ये सेव्ह होतात.

AAHA... FRESH
युरोपमध्ये स्थलांतरितांचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे. यामुळे या स्थलांतरितांसाठी एक संपूर्ण बेटच विकत घेण्याचा खुला प्रस्ताव इजिप्तमधील नगीब सावीरिस या अब्जाधीशाने दिला आहे. इटली अथवा ग्रीसजवळील बेट विकत घेण्याची तयारी सावीरिस यांनी दर्शविली आहे. ग्रीस अथवा इटलीने मला बेट विकत द्यावे. मी त्याचे स्वातंत्र्य घोषित करून स्थलांतरितांसाठी तेथे नवा देश उभा करेन, असे सावीरिस यांनी जाहीर केले आहे.
 

Light Mood

शिक्षक : काय रे परवा शिकवणीला का आला नाही?
विद्यार्थी : माझ्याकडे एकच शर्ट-पॅन्ट आहे ते मी धुवायला टाकले होते.
शिक्षक : मग काल का आला नाहीस
विद्यार्थी : आलो होतो, पण अंगणात तुमचे शर्ट-पॅन्ट वाळत घातले होते...

शेअर 1.9 अंकांनी खाली
आयपॉड, आयफोन आणि आयपॅड या उत्पादनांमध्ये बाप असलेल्या अ‍ॅपलने आपले नवीन प्रोडक्ट लाँच केले. परंतु या लाँचिंगच्या धडाक्यानंतर लगेच या कंपनीचे शेअर 1.9 अंकांनी खाली आले. अ‍ॅपलकडून मोठया अपेक्षा असताना प्रत्यक्ष प्रोडक्ट लाँचिंगच्या वेळेस त्या अपेक्षा पूर्ण होताना दिसल्या नाहीत. म्हणून कंपनीचे शेअर कोसळले, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

Web Title: Apple's new smart device launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.