Lokmat Money > बिझनेस न्यूज > अ‍ॅपलच्या आयफोन्सची तिमाहीत विक्रमी विक्री

अ‍ॅपलच्या आयफोन्सची तिमाहीत विक्रमी विक्री

अ‍ॅपल कंपनीने डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत ७४.५ दशलक्ष आयफोन्सची विक्री करून ७४.६ अब्ज डॉलरचा महसूल कमावला आहे.

By admin | Updated: January 29, 2015 01:04 IST2015-01-29T01:04:54+5:302015-01-29T01:04:54+5:30

अ‍ॅपल कंपनीने डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत ७४.५ दशलक्ष आयफोन्सची विक्री करून ७४.६ अब्ज डॉलरचा महसूल कमावला आहे.

Apple's iPhone quartile sales record | अ‍ॅपलच्या आयफोन्सची तिमाहीत विक्रमी विक्री

अ‍ॅपलच्या आयफोन्सची तिमाहीत विक्रमी विक्री

वॉशिंग्टन : अ‍ॅपल कंपनीने डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत ७४.५ दशलक्ष आयफोन्सची विक्री करून ७४.६ अब्ज डॉलरचा महसूल कमावला आहे. गेल्यावर्षी हा महसूल ५७.६ अब्ज डॉलरचा होता. ही ताजी उलाढाल कंपनीच्या अपेक्षेपेक्षाही जास्त (२९.५ टक्के) आहे.
आयफोन सिक्स आणि सिक्स प्लसची ही विक्रमी विक्री सुटीच्या हंगामात आणि चीनमध्ये झाली आहे. विश्लेषकांना ६७.६९ अब्ज डॉलरचा महसूल मिळण्याची अपेक्षा होती.
अ‍ॅपलचे मुख्य आर्थिक अधिकारी लुका माएस्ट्री म्हणाले की, चीनमध्ये केलेल्या पाहणीत मिळालेल्या संकेतांनंतरही आम्ही चीनमध्ये अमेरिकेपेक्षा जास्त आयफोन्स विकू शकलो नाही. चीनच्या मोबाईल कंपनीशी केलेल्या भागीदारीमुळे ही विक्री झाली. आयफोन सिक्स आणि आयफोन सिक्स प्लसच्या स्क्रीनचा मोठा आकार यामुळे विक्री वाढल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Apple's iPhone quartile sales record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.