केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात आर्थिक सुधारणांवर भर देतील तसेच सवलती मिळून ‘अच्छे दिन’ येतील या आशेवर मुंबई शेअरबाजारात गतसप्ताहात तेजी दिसून आली. संवेदनशील निर्देशांक तसेच निफ्टीने नवीन उच्चांकाची नोंद केली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या दरामध्ये आलेली स्थिरता आणि पावसाबाबतच्या नव्या अंदाजाने बाजाराला आणखी बळ दिले. परकीय वित्त संस्थांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी करून बाजार तेजीत आणला.
मुंबई शेअरबाजारात गतसप्ताहात तेजी राहिली. बाजारात झालेल्या व्यवहारांपैकी चार दिवस बाजार तेजीत होता. मुंबई शेअरबाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने २५९८१.५१ अशी नवीन उच्चांकी झेप घेतली. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक २५९६२ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये ८६२ अंश म्हणजेच ३.४ टक्के वाढ झाली. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक (निफ्टी) २४३ अंश म्हणजेच ३.२ टक्क्यांनी वाढून ७७५२ अंशांवर बंद झाला. तत्पूर्वी या निर्देशांकाने ७७५८ अंश असा नवीन उच्चांक नोंदविला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या दोन्ही क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाढ झाली. ही वाढ अनुक्रमे ३.७ आणि ४.८ टक्के एवढी राहिली.
परकीय वित्त संस्थांनी गत सप्ताहात मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्याने बाजारातील तेजीत आणखी वाढ झाली. या संस्थांनी चालू वर्षात आतापर्यंत ६२ हजार ५३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. इराकमधील संघर्ष आता थोडा कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमती काहीशा स्थिरावल्या आहेत. त्याचप्रमाणे पावसाच्या नवीन अंदाजाने बाजारही सुखावला. त्यामुळेही तेजीला आणखी उधाण आले. आगामी अर्थसंकल्पाबाबत बाजाराच्या मोठ्या अपेक्षा आहेत. भाजपाला एक हाती सत्ता मिळाल्याने आर्थिक सुधारणांना आणखी वेग येण्याची अपेक्षा आहे. ‘अच्छे दिन आनेवाले है’ अशी जाहिरात करत असलेल्या भाजपाकडून बाजाराच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात आहेत. आगामी अर्थसंकल्पात विविध उद्योगांना मोठ्या प्रमाणावर सवलती मिळण्याची अपेक्षा असल्यामुळे बाजारात तेजी निर्माण झाली आहे. १९९७ नंतर प्रथमच अर्थसंकल्पपूर्व तेजी ऐवढ्या जोरात आलेली दिसून आली. या आधीच्या अकरा अर्थसंकल्पांपूर्वीच्या सप्ताहामध्ये बाजारात निराशेचे वातावरण दिसून आले आहे. त्यामुळे या काळात निर्देशांक घटलेला दिसून येतो. दोन दशकांत प्रथमच अर्थसंकल्प पूर्व सप्ताहामध्ये निर्देशांक ३ टक्क्यांहून अधिक वाढलेला दिसून आला. आगामी काळातील शेअर बाजारांची वाटचाल मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील तरतुदींवर अवलंबून राहील.
बाजाराचा आणखी एक उच्चांक
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात आर्थिक सुधारणांवर भर देतील तसेच सवलती मिळून ‘अच्छे दिन’ येतील
By admin | Updated: July 7, 2014 04:50 IST2014-07-07T04:50:22+5:302014-07-07T04:50:22+5:30
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात आर्थिक सुधारणांवर भर देतील तसेच सवलती मिळून ‘अच्छे दिन’ येतील
