इंदौर : वजनदार आंब्याची प्रजाती ‘नूरजहाँ’ हवामानातील बदलामुळे थोडी सडपातळ झाली असली तरी या दुर्मिळ राजेशाही फळाला नेहमीप्रमाणेच तगडा भाव मिळत आहे. या प्रजातीच्या एका आंब्याचे वजन साडेतीन ते पावणेचार किलो असते.
या भरभक्कम आंबा प्रजातीची झाडे मध्यप्रदेशातील आदिवासीबहुल अलिराजपूर जिल्ह्याच्या कठ्ठीवाडा भागातच आढळून येतात. नूरजहाँचे प्रमुख उत्पादक शिवराज जाधव यांनी सांगितले की, यावेळी नूरजहाँ फळाचे सरासरी वजन ३.५ किलो एवढे राहिले. ते गेल्या वर्षीच्या तुलनेत ३०० ग्रॅम कमी आहे. गेल्या वर्षी या प्रजातीच्या फळाचे सरासरी वजन ३.८ किलोग्रॅम भरले होते. यावेळी नूरजहाँचे वजन गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक राहील, अशी आशा आम्हाला होती; मात्र हवामानापुढे कोणाचे काय चालू शकते.
झाडांना यावर्षी उशिराने मोहर आला, तर मान्सूनचा पाऊस हंगामाच्या एक आठवडा आधीच दाखल झाला. त्यामुळे नूरजहाँची झाडे वेळेच्या आधीच पाडाला लागली आणि त्याचा परिणाम फळाच्या वजनावर झाला. नूरजहाँचे वजन कमी झाले असले तरी त्याच्या चाहत्यांत मात्र घट झालेली नाही. बाजारात या आंब्याचा व्यवहार किलोच्या नाही तर नगाच्या आधारे होतो. यावेळीही बाजारात नूरजहाँ प्रजातीच्या आंब्यांना मोठी मागणी आहे. या प्रजातीच्या केवळ एकाच फळाची किंमत ३०० ते ५०० रुपये असते.
आंब्याची राणी नूरजहाँचे वजन घटले
वजनदार आंब्याची प्रजाती ‘नूरजहाँ’ हवामानातील बदलामुळे थोडी सडपातळ झाली असली तरी या दुर्मिळ राजेशाही फळाला नेहमीप्रमाणेच तगडा भाव मिळत आहे.
By admin | Updated: June 24, 2015 00:21 IST2015-06-24T00:21:10+5:302015-06-24T00:21:59+5:30
वजनदार आंब्याची प्रजाती ‘नूरजहाँ’ हवामानातील बदलामुळे थोडी सडपातळ झाली असली तरी या दुर्मिळ राजेशाही फळाला नेहमीप्रमाणेच तगडा भाव मिळत आहे.
