ननालाच घडाभर तेल..अल्कोमीटरपेक्षा खरेदी प्रक्रिया महागातकेंद्र सरकारकडून मिळाले चार लाखनिविदा प्रक्रियेवर खर्च दोन लाखवासुदेव पागी/पणजी : ‘नमनालाच घडाभर तेल..’ अशी म्हण प्रसिद्ध आहे. याचा अर्थ मूळ काम राहिले बाजूला आणि भलत्याच कारणांसाठी अवाढव्य खर्च करावा लागला. पोलिसांना सध्या हा अनुभव घ्यावा लागला. त्याचे काय झाले की केंद्राने पोलीस खात्याला अल्कोमीटरसाठी दिले चार लाख. मात्र, त्यातील दोन लाख खर्चावे लागले केवळ निविदांवरच. बरं, एवढे करूनही कंत्राट झालेच नाही, म्हणजे पोलिसांचे नमनही गेले वाया.पोलीस खात्याच्या वाहतूक विभागासाठी केंद्र सरकारकडून चार लाख हे अल्कोमीटर खरेदीसाठी दिले. आठ अल्कोमीटरसाठी वाहतूक खात्याने निविदा जारीही केल्या. केवळ एकाच कंत्राटदाराने बोली पाठविली. दोन लाखांपेक्षा अधिक रकमेच्या कंत्राटासाठी नियमानुसार एक निविदा आल्यास कंत्राटप्रक्रिया पुढे नेता येत नाही. झाली पंचाईत. पुन्हा निविदांचे रामायण करावे लागले. पुन्हा लावली एकानेच बोली, आता बोला? त्यामुळे पुन्हा वाहतूक खात्यासमोर पेच. काय करायचे? दोन्ही निविदा प्रक्रियेत मिळून दोन लाख गेले म्हणजे नमनालाच घडाभर तेल वाया. स्थानिक आणि राष्ट्रीय दैनिकांतून जाहिराती केल्या आणि खर्च वाढला. गोव्यातील चार आणि राष्ट्रीय दोन वृत्तपत्रांत दोन वेळा जाहिराती दिल्याचे सूत्रांनी सांगितली. याविषयी वाहतूक अधीक्षक अरविंद गावस यांना विचारले असता त्यांनी निविदा प्रक्रिया पाळूनच कंत्राटे बहाल करावी लागत असल्यामुळे असे घडल्याचे सांगितले. एका कंत्राटदाराची बोली आल्यास कंत्राटाच्या नियमानुसार ती स्वीकारून प्रक्रिया पुढे नेणे शक्य नाही. त्यामुळे दुसर्यांदा निविदा जारी कराव्या लागल्या. दुसर्यांदा निविदा जारी केल्यानंतरही तोच प्रकार आढळून आल्यामुळे आता निर्णय घेण्यासाठी सरकारकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. आता सरकारची अनुमती मिळाली तर बोली लावलेल्या कंत्राटदाराला हे कंत्राट देणे वाहतूक विभागाला शक्य आहे. त्यामुळे अल्कोमीटर लवकर मिळण्याची शक्यता आहे. सरकारने या प्रस्तावावर सध्या तरी कोणताच निर्णय नाही घेतला.अल्कोमीटर म्हणजे काय?अल्कोमीटरमध्ये फुंकले की व्यक्ती दारू पिली आहे की नाही ते समजते. वाहनचालकांना पुराव्यासहीत पकडण्यासाठी अल्कोमीटर वापरले जाते. माणूस किती दारू पिला आहे तेही डिजिटल स्वरूपात मीटर दाखविते. एका अल्कोमीटरचा वापर किमान दहा हजार चाचण्यांसाठी होऊ शकतो. एका अल्कोमीटरची किंमत खुल्या बाजारात 30 पासून 50 हजारांपर्यंत आहे.
अल्कोमीटर : सुधारित
नमनालाच घडाभर तेल..
By admin | Updated: September 11, 2014 22:54 IST2014-09-11T22:54:09+5:302014-09-11T22:54:09+5:30
नमनालाच घडाभर तेल..
