नवी दिल्ली : ई-कॉमर्स क्षेत्रातील चीनमधील ‘अलीबाबा’ या कंपनीचे संस्थापक आणि कार्यकारी चेअरमन जॅक मा यांना २०१४ मध्ये सर्वाधिक धनलाभ झाला. या वर्षात त्यांची संपत्ती १८.५ अब्ज डॉलरने वाढत २९.२ अब्ज डॉलर झाली आहे.
अलीबाबाने सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या आयपीओला जोरदार प्रतिसाद मिळाल्याने शेअर बाजारात अलीबाबाची कामगिरी लक्षवेधक राहिली. त्यामुळे इंग्रजीचे शिक्षक ते अब्जाधीश अशी वाटचाल करणारे जॅक मा यांच्या संपत्तीत १७३ टक्के वाढ झाली, असे वेल्स एक्स या खाजगी संपत्ती क्षेत्रातील सल्लागार कंपनीने म्हटले आहे.
जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे बिल गेट्स यांच्या संपत्तीतही २०१४ मध्ये १०.५ अब्ज डॉलरची भर पडली. ते या यादीत तिसऱ्या स्थानी आहेत.
सार्वधिक नफा कमावणाऱ्या पाच अग्रणी व्यक्तीत फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग, अॅल्टीस या दूरसंचार कंपनीचे संस्थापक पॅट्रिक द्राही यांचा समावेश आहे. झुकेरबर्ग यांची संपत्ती ८.४ अब्ज डॉलरने, तर द्राही यांची संपत्ती ५.१ अब्ज डॉलरने वाढली आहे.
सर्वाधिक तोटा झालेल्यांच्या यादीत लिओनिड मिखेल्सन, सॉफ्ट बँकेचे सीईओ मसायोशी सन, लुई ची वू, अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस आणि शेल्डन अॅडेल्सन यांचा पहिल्या पाचमध्ये समावेश आहे.
अलीबाबा ई-कॉमर्सचे संस्थापक जॅक मा यांना सर्वाधिक धनलाभ
: ई-कॉमर्स क्षेत्रातील चीनमधील ‘अलीबाबा’ या कंपनीचे संस्थापक आणि कार्यकारी चेअरमन जॅक मा यांना २०१४ मध्ये सर्वाधिक धनलाभ झाला
By admin | Updated: December 18, 2014 04:57 IST2014-12-18T04:57:19+5:302014-12-18T04:57:19+5:30
: ई-कॉमर्स क्षेत्रातील चीनमधील ‘अलीबाबा’ या कंपनीचे संस्थापक आणि कार्यकारी चेअरमन जॅक मा यांना २०१४ मध्ये सर्वाधिक धनलाभ झाला
