आोट : सातपुड्याच्या पायथ्याशी भरणारा आकोट तालुक्याचा आठवडी बाजार हा भाजी बाजार नव्हे; तर कचर्याचा उकिरडा व भंगार दुकानाचा विळख्यात भरलेला चिखल बाजार झाला आहे. त्यामुळे आठवडी बाजाराकरिता एकमेव राखीव असलेली जागा विविध समस्यांनी घेरली आहे. बाजार नाहीसा होत आहे. गत १०० वर्षांपासून कुठल्याही सुविधा बाजारात उपलब्ध करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे बाजाराला येणार्यांना भाजीपाला घेण्याऐवजी मानसिक त्रासच सहन करावा लागत आहे.आकोट तालुक्याची लोकसंख्या २ लाखांच्या वर आहे. तालुक्यात १०८ खेड्यांचा समावेश आहे. रविवारला भरणार्या या बाजारात आदिवासीबहुल भागातील गावकर्यांसह तालुक्यातील नागरिक येतात; परंतु पावसाळ्यात आठवडी बाजारात जाता येत नाही. घाण, कचरा व चिखल असल्याने मोठी कसरत करावी लागते. बाजार ओटे नसल्याने सर्वत्र दुर्गंधी वातावरणात चिखलात भाजीपाला विकल्या जात आहे. आठवडी बाजाराचे क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणात आहे; परंतु बाजार भरल्यानंतर रस्तासुद्धा राहत नाही. पावसाळ्याच्या दिवसात बाजारातील रस्ते चिखलाने माखल्या गेले, ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले. शिवाय मोकाट जनावरांचा मोठ्या प्रमाणात मुक्त संचार असल्याने बाजारात खरेदी-विक्री करणार्यांची मोठी पंचाईत होते. विशेष म्हणजे आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात भंगार विक्री करणार्या दुकानदारांनी ताबा मिळविला आहे. ठिकठिकाणी दुकाने थाटल्याने तसेच खुल्या मैदानात भंगाराचे साहित्य पडले असल्याने बाजाराच्या दिवशी दुकाने लावणे कठीण झाले आहे. तसेच आठवडी बाजारात येणार्या चारही रस्त्यावर दारूची दुकाने असल्याने दारुड्यांचा व सुरू असलेल्या अवैध धंद्यावाल्यांचा बाजारात येणार्या महिला व सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)
आकोटचा भाजी बाजार नव्हे...चिखल बाजार!
आकोट : सातपुड्याच्या पायथ्याशी भरणारा आकोट तालुक्याचा आठवडी बाजार हा भाजी बाजार नव्हे; तर कचर्याचा उकिरडा व भंगार दुकानाचा विळख्यात भरलेला चिखल बाजार झाला आहे. त्यामुळे आठवडी बाजाराकरिता एकमेव राखीव असलेली जागा विविध समस्यांनी घेरली आहे. बाजार नाहीसा होत आहे. गत १०० वर्षांपासून कुठल्याही सुविधा बाजारात उपलब्ध करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे बाजाराला येणार्यांना भाजीपाला घेण्याऐवजी मानसिक त्रासच सहन करावा लागत आहे.
By admin | Updated: August 31, 2014 22:51 IST2014-08-31T22:51:07+5:302014-08-31T22:51:07+5:30