Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्पेक्ट्रम भागीदारीसाठी एअरटेलशी चर्चा

स्पेक्ट्रम भागीदारीसाठी एअरटेलशी चर्चा

चार सर्कलमधील स्पेक्ट्रमच्या भागीदारीसाठी सरकारी क्षेत्रातील बीएसएनएल खाजगी भारती एअरटेलशी चर्चा करीत आहे

By admin | Updated: March 11, 2016 03:26 IST2016-03-11T03:26:19+5:302016-03-11T03:26:19+5:30

चार सर्कलमधील स्पेक्ट्रमच्या भागीदारीसाठी सरकारी क्षेत्रातील बीएसएनएल खाजगी भारती एअरटेलशी चर्चा करीत आहे

Airtel talk for spectrum participation | स्पेक्ट्रम भागीदारीसाठी एअरटेलशी चर्चा

स्पेक्ट्रम भागीदारीसाठी एअरटेलशी चर्चा

नवी दिल्ली : चार सर्कलमधील स्पेक्ट्रमच्या भागीदारीसाठी सरकारी क्षेत्रातील बीएसएनएल खाजगी भारती एअरटेलशी चर्चा करीत आहे. याबाबतच्या सौद्याला जूनपर्यंत अंतिम स्वरूप दिले जाण्याची शक्यता आहे.
राजस्थान, उत्तर प्रदेश (पश्चिम), बिहार आणि आसाम या चार राज्यांतील सर्कलमध्ये बीएसएनएलची स्पेक्ट्रम भागीदारीची योजना आहे. या योजनेची व्यावहारिकता तपासण्यासाठी बीएसएनएलने एक समिती गठित केली आहे.
बीएसएनएलचे चेअरमन व प्रबंध संचालक अनुपाल श्रीवास्तव यांनी एका वृतसंस्थेला सांगितले की, याबाबत प्राथमिक चर्चा सुरू आहे. बीएसएनएलने सर्व दूरसंचार कंपन्यांशी स्पेक्ट्रम भागीदारीचा पर्याय खुला ठेवला आहे. तूर्त आम्ही एअरटेलशी चर्चा करीत आहोत. ते म्हणाले की, कंपनीने या प्रकरणाची व्यावहारिकता तपासण्यासाठी एक समिती गठित केली आहे. ही समिती अन्य कंपन्यांसोबतही हातमिळवणी करू शकते.
सरकारने गेल्या वर्षी स्पेक्ट्रम भागीदारासाठी नियम शिथिल केले होते. त्यानुसार कंपन्यांना समान बँकमध्ये स्पेक्ट्रम भागीदारी करण्याची मुभा आहे.

Web Title: Airtel talk for spectrum participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.