Airtel Recharch Plans: एअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशातील कोट्यवधी मोबाइल युजर्स एअरटेलशी जोडलेले आहेत. एअरटेल आपल्या युजर्सना अनेक रिचार्ज प्लान्स ऑफर करते. यासोबतच वेळोवेळी अनेक ऑफर्सही दिल्या जातात, जेणेकरून युजर्स आकर्षित होतील. आता एअरटेलनं आपल्या युजर्ससाठी एक नवीन रिचार्ज प्लान आणला आहे. एअरटेलचा नवा रिचार्ज प्लॅन खूप खास आहे कारण एअरटेल ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खूप चांगले फायदे देत आहे. चला जाणून घेऊया.
एअरटेलच्या ४४८ रुपयांच्या या नव्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्संना मोबाइलसोबत डीटीएच (Digital TV) बेनिफिट्स दिले जात आहेत. चला जाणून घेऊया.
एअरटेलचा ४४८ रुपयांचा प्रीपेड प्लान
एअरटेलचा ४४८ रुपयांचा प्लॅन हा मोबाईल + डीटीएच प्लॅन या नावानं सादर करण्यात आला आहे. या प्लानमध्ये युजर्संना २८ दिवसांची पूर्ण वैधता मिळते. या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा फायदा मिळतो. तसंच दररोज २.५ जीबी डेटा आणि दररोज १०० फ्री एसएमएसदेखील मिळतात. या प्लानमध्ये युजर्स अनलिमिटेड ५जी डेटाचा ही फायदा घेऊ शकतात. याशिवाय या प्लॅनमध्ये एक्स्ट्रा रिवॉर्ड्सचाही समावेश आहे.
उदाहरणार्थ, एअरटेल डिजिटल टीव्ही सब्सक्रिप्शन, ज्यामध्ये युजर्स २८ दिवसांसाठी २५० हून अधिक टीव्ही चॅनल्सचा फायदा घेऊ शकतात. इतकंच नाही तर या प्लानमध्ये युजर्संना एअरटेल एक्सट्रीम अॅप, अपोलो २४/७ सर्कल मेंबरशिप तीन महिन्यांसाठी फ्री कंटेंट अॅक्सेस आणि फ्री हॅलोट्यून्स देखील मिळतात. एअरटेलच्या ४४८ रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज सरासरी १६ रुपयांमध्ये मोबिलिटी आणि डीटीएच सेवेचा आनंद घेऊ शकतात.