Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Airtel नं आणले ३ नवे रिचार्ज प्लान्स, कमी किंमतीत अनलिमिटेड बेनिफट्स; OTT चाही मोफत लाभ

Airtel नं आणले ३ नवे रिचार्ज प्लान्स, कमी किंमतीत अनलिमिटेड बेनिफट्स; OTT चाही मोफत लाभ

Airtel Recharge Plans: एअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. मोबाइल युजर्सच्या बाबतीत एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर आहे, एअरटेल आपल्या युजर्ससाठी वेळोवेळी नवनवीन रिचार्ज प्लान आणत असते.

By जयदीप दाभोळकर | Updated: May 29, 2025 14:22 IST2025-05-29T14:21:56+5:302025-05-29T14:22:39+5:30

Airtel Recharge Plans: एअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. मोबाइल युजर्सच्या बाबतीत एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर आहे, एअरटेल आपल्या युजर्ससाठी वेळोवेळी नवनवीन रिचार्ज प्लान आणत असते.

Airtel brings 3 new recharge plans unlimited benefits at low prices ott benefits also free | Airtel नं आणले ३ नवे रिचार्ज प्लान्स, कमी किंमतीत अनलिमिटेड बेनिफट्स; OTT चाही मोफत लाभ

Airtel नं आणले ३ नवे रिचार्ज प्लान्स, कमी किंमतीत अनलिमिटेड बेनिफट्स; OTT चाही मोफत लाभ

Airtel Recharge Plans: एअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. मोबाइल युजर्सच्या बाबतीत एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर आहे, एअरटेल आपल्या युजर्ससाठी वेळोवेळी नवनवीन रिचार्ज प्लान आणत असते. अशातच एअरटेलनं पुन्हा एकदा तीन नवे स्वस्त रिचार्ज प्लान्स सादर केले आहेत, ज्यामुळे युजर्सना फायदा होणारे. या नव्या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड बेनिफिट्सचा फायदा मिळणार आहे. त्याचबरोबर या प्लॅन्समध्ये तुम्हाला झी ५, नेटफ्लिक्स आणि जिओ हॉटस्टार सारख्या अॅप्ससह अनेक ओटीटी अॅप्सचा अॅक्सेस देखील मिळणार आहे. चला जाणून घेऊया.

२७९ रुपयांचा प्रीपेड प्लान

एअरटेलचा २७९ रुपयांचा प्लान १ महिना म्हणजेच ३० दिवसांच्या वैधतेसह येतो. एअरटेलचा हा प्लान एक प्रीपेड कंटेंट ओन्ली पॅक आहे, ज्यामध्ये युजर्संना नेटफ्लिक्स बेसिक, झी ५, जिओ हॉटस्टार आणि एअरटेल एक्सट्रीम प्ले प्रीमियमचं सब्सक्रिप्शन दिलं जातं. याशिवाय युजर्संना सोनीलिव्ह, लायन्सगेट प्ले आणि आहा, सननेक्स्ट, होईचोई, इरॉसनाऊ आणि शेमारूम अशा अनेक प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस मिळतो. त्याचबरोबर युजर्संना या प्लानमध्ये १ जीबी डेटाचा ही फायदा मिळतो.

Netflix, Amazon Prime बाबत दोन महत्त्वाच्या अपडेट, लवकरच या डिव्हाईसेसवर काम करणं होणार बंद

एअरटेलचा ५९८ रुपयांचा प्रीपेड प्लान

एअरटेलच्या ५९८ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड फ्री कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा आणि दररोज १०० फ्री एसएमएस मिळतात. यासोबतच अनलिमिटेड ५जी डेटाही मिळतो. या प्लानमध्ये युजर्संना नेटफ्लिक्स बेसिक, झी ५, जिओ हॉटस्टार आणि एअरटेल एक्सट्रीम प्लेचे प्रीमियम सब्सक्रिप्शन देखील मिळतं.

एअरटेलचा १७२९ रुपयांचा प्लान

एअरटेलचा १७२९ रुपयांचा प्लान ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो. ८४ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड फ्री कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा आणि दररोज १०० फ्री एसएमएसचा लाभ मिळतो. यासोबतच अनलिमिटेड ५जी डेटाही मिळतो. या प्लानमध्ये युजर्संना नेटफ्लिक्स बेसिक, झी ५, जिओ हॉटस्टार आणि एअरटेल एक्सट्रीम प्लेचे प्रीमियम सब्सक्रिप्शन देखील मिळतं. यासोबतच आणखी अनेक लोकप्रिय ओटीटींचा अॅक्सेस देण्यात येतो.

Web Title: Airtel brings 3 new recharge plans unlimited benefits at low prices ott benefits also free

टॅग्स :Airtelएअरटेल