नवी दिल्ली : जगभरात घसरत चाललेल्या इंधनाच्या किमती पाहून सरकारने शुक्रवारी विमान इंधनाच्या दरात १0 टक्के कपात केली. त्याचवेळी सबसिडी नसलेल्या स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलिंडरचे दर ४९.५ रुपयांनी वाढविले.
याबरोबरच सबसिडी नसलेल्या केरोसिनचे दरही लिटरमागे १ रुपया ५ पैशांनी कपात करून ते ४३ रुपये ४९ पैसे प्रति लिटर असे करण्यात आले. दिल्लीत विमानाच्या इंधनाचा दर किलोलिटरमागे ४,४२८ रुपयांनी कमी होऊन तो ३९,८९२.३२ प्रति लिटर झाला. सलग दुसऱ्या महिन्यात अशा प्रकारची विमानाच्या इंधन दरात कपात करण्यात आली आहे. यापूर्वी १ डिसेंबर २0१५ रोजी विमानाच्या इंधन दरात १.१७ टक्क्याने कपात करण्यात आली होती. स्थानिक विक्रीकर आणि मूल्याधारित कर यामुळे विविध विमानतळांवरील इंधनाचे दर वेगवेगळे आहेत. विमानावरील होणाऱ्या एकूण खर्चापैकी ४0 टक्के खर्च इंधनावर होतो. आता इंधन दरात कपात करण्यात आल्याने विमान कंपन्यांवरील खर्चाचे ओझे कमी होईल.
होणार आहे. या इंधन दर कपातीचा प्रवासी भाड्यावर कसा परिणाम होईल, हे मात्र कंपन्यांकडून कळू शकले नाही.
विमान इंधनाचे दर कमी करीत असताना तेल कंपन्यांनी सबसिडी नसलेल्या एलपीजी गॅस सिलिंडरचे दर ४९.५ रुपयांनी वाढविले. आता या सिलिंडरचा दर दिल्लीत ६५७.५0 रुपये झाला आहे. गेल्या तीन महिन्यांत करण्यात आलेली ही तिसरी दरवाढ आहे. यापूर्वी सबसिडी नसलेल्या गॅस सिलिंडरचे दर १ डिसेंबर २0१५ रोजी ६१ रुपये ५0 पैशांनी वाढविण्यात आले होते.
सबसिडी असलेल्या गॅस सिलिंडरचा दिल्लीत दर ४१९ रुपये ३३ पैसे आहे. नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी इंडियन आॅईल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांनी हा निर्णय घेतला.
विमान इंधन दहा टक्क्यांनी स्वस्त
जगभरात घसरत चाललेल्या इंधनाच्या किमती पाहून सरकारने शुक्रवारी विमान इंधनाच्या दरात १0 टक्के कपात केली. त्याचवेळी सबसिडी नसलेल्या स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलिंडरचे
By admin | Updated: January 2, 2016 08:35 IST2016-01-02T08:35:49+5:302016-01-02T08:35:49+5:30
जगभरात घसरत चाललेल्या इंधनाच्या किमती पाहून सरकारने शुक्रवारी विमान इंधनाच्या दरात १0 टक्के कपात केली. त्याचवेळी सबसिडी नसलेल्या स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलिंडरचे
