राजरत्न सिरसाट, अकोला
गतवर्षी हजारो हेक्टरवरील सोयाबीन बियाणे अनुत्पादित निघाल्याने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) या वर्षी खबरदारी घेतली असून, बियाण्यांची उगवण क्षमता तपासूनच बियाण्यांच्या गोण्या भरण्यात आल्या आहेत. प्रत्येक गोणीमध्ये हिरव्या रंगाचे बियाणे टाकण्यात आले असून, ते उघड्या डोळ्यांनी दिसणार नाही. त्याकरिता अल्ट्रा व्हॉयलेट किरणांचा वापर करावा लागणार आहे. या तंत्रज्ञानामुळे गोण्यांमधील बियाणे महाबीजचे आहे की नाही, हे ओळखता येणार आहे.
गतवर्षी पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील १४ हजार हेक्टरवरील सोयाबीन पीक उलटले. यासंदर्भात एक हजाराच्या वर शेतकऱ्यांनी तक्रारी करून, बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यामध्ये सर्वाधिक तक्रारी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) सोयाबीन बियाण्यांबाबत झाल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन पिकांची दुबार, तिबार पेरणी करावी लागल्याने शेतकरी जेरीस आला होता. नुकसानभरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी महाबीजकडे मागणी केली होती.
एक-दोन तक्रारी वगळता महाबीजने जवळपास सर्व तक्रारींचा निपटारा करू न शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली; पण अनुत्पादित निघालेले बियाणे महाबीजचेच होते का, हे मात्र महाबीजला ओेळखता आले नसल्याने, या वर्षी महाबीजने खबरदारी घेतली आहे.
या वर्षी शेतकऱ्यांना या पद्धतीचा त्रास होऊ नये, यासाठी महाबीजने नवे प्रयोग केले असून, बियाणे ओळखण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर २५० क्ंिंवटल सोयाबीन बियाण्यांना हिरवा रंग लावला. त्या बियाण्यांवर विशिष्ट प्रयोग करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या बियाण्यांचा रंग उघड्या डोळ्याने दिसत नसून, त्यासाठी अल्ट्रा व्हॉयलेट किरणांचा वापर अनिवार्य आहे. त्यासाठी अल्ट्रा व्हॉयलेट किरणांचा विशिष्ट पेन तयार केला आहे. या पेनमधूनच गोण्यांतील हिरवे बियाण्याचे दाणे ओळखता येणार आहेत.
अहो आश्चर्यम्... बियाणे तपासणारे अदृश्य तंत्रज्ञान!
गतवर्षी हजारो हेक्टरवरील सोयाबीन बियाणे अनुत्पादित निघाल्याने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) या वर्षी खबरदारी घेतली असून
By admin | Updated: May 1, 2015 23:07 IST2015-05-01T23:07:52+5:302015-05-01T23:07:52+5:30
गतवर्षी हजारो हेक्टरवरील सोयाबीन बियाणे अनुत्पादित निघाल्याने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) या वर्षी खबरदारी घेतली असून
